शेती करणं अवघड झालंय; इथला काश्मीरला जाऊन शेती करणार आहे का? शरद पवार

पिंपळगाव: ‘महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदी आणि शहा या दोघांच्या तोंडात फक्त कलम ३७० आणी शरद पवार ही दोन नावं असतात. अमित शहा यांची तर मला काळजी वाटते. रात्री झोपेतही ३७० म्हणत असेल. त्यांची बायको काय म्हणत असेल याची मला चिंता आहे. इथं शेती करणं अवघड झालंय कोण त्या काश्मीरला जाऊन शेती करणार हे मला सांगा?’ असं म्हणत एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा खरपूर समाचार घेतला.
#पिंपळगाव येथील सभेत #निफाड मतदारसंघाचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारानिमित्त सभा घेतली. देशाचे पंतप्रधान देशाच्या बाहेर जातात आणि देशाची भूमिका मांडतात. या पदाची प्रतिष्ठा आणि मान राखला पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते ही प्रतिष्ठा ठेवताना दिसत नाहीत. #NCP2019 pic.twitter.com/Mf3qTtfd3S
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 17, 2019
‘मोदी आणि शहा मला विचारतात, पवारांनी काय केलं? धोरणांवर टीका करा, पण वैयक्तिक टीका का? असा सवाल करत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या टीकेला उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधल्याने आगामी काळातही प्रचारादरम्यान एनसीपी आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार सामना होणार असल्याचं दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं