१९८० मध्ये पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं: भाजप खा. संजय काकडे

पुणे: महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस-एनसीपी’सोबत जात ऐतिहासिक आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. परंतु, ही आघाडी टिकणार नाही, सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रोटोकॉलनुसार भेट झाली, यादरम्यान त्यांच्यात काहीसं बोलणंही झालं, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. पंतप्रधान येण्यापूर्वी तसंच पंतप्रधान गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि फडणवीस विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात एकत्र होते. तिथे त्यांच्यात काही वेळ बोलणं झालं, असं काकडे म्हणाले.
मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज पुणे येथे पोलिस महासंचालकांच्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मा. @narendramodi जी यांचे स्वागत केले.
यावेळी राज्यपाल @BSKoshyari जी,केंद्रीय गृहमंत्री @AmitShah जी, विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी उपस्थित होते. pic.twitter.com/GFDJ0qz4IA
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 6, 2019
तसंच या सरकारला सध्या तरी काही धोका नाही, हे सरकार दीर्घकाळ चालेल. हे सरकार चालायला पाहिजे असं वाटतं. १९८० मध्ये शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं, अशी प्रतिक्रिया काकडेंनी दिली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धक्का देत थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर भाजपचे नेते हे सरकार टिकणार नाही असं म्हणत असताना भाजपचे खासदार संजय काकडे यांनी मात्र त्याला छेद दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं