राज यांनी सांगितलेले 'ते' अदृश्य हात मोठी खेळी खेळत आहेत? - सविस्तर वृत्त

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला अभूतपूर्व असं नाट्यमय वळण लागलं आहे. सत्ता स्थापनेच्या खेळात सोमवारी अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पाठिंबा देईल असं वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणी सेना नेते राज्यपालांना भेटले पण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा वेळेत मिळाला नाही. त्यातच राज्यपालांनी सेनेला सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. सेनेची वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण मिळालं आहे. आता काँग्रेसचा निर्णय सकारात्मक आला तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह सरकार स्थापनेचा दावा करू शकते. पण त्यासाठीही शिवसेनेचं साहाय्य लागेल. हे तीन पक्ष एकत्र आले तरच सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ उभारू शकतात.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रिपदासाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि काँग्रेस-सेना यांनी पाठिंबा दिला तर सत्तेत वाटाघाटी करताना दोन मुख्यमंत्री पदे असू शकतात. यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोघांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. सेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देऊन काँग्रेसची अट मान्य केल्याचं म्हटलं जात होतं. तरीही सेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्या देण्याकडे काँग्रेसचा कल असल्याचंही समजते.
दरम्यान, शिवसेनेला देशपातळीवर राजकारण करायचं आहे, केरळमधील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अमर्थता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न देण्यामागे शरद पवारांनी सोनिया गांधी यांनी दिलेली माहिती हेच कारण असल्याचं समजतं. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान असताना, सोमवारी सायंकाळी ६ वाजता शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती.
सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन १५ मिनिटे चर्चा झाली होती. त्यावेळी, पवारांच्या सांगण्यावरुनच सोनिया गांधींनी शिवसेनेला पत्र देण्यास नकार दिल्याचं समजते. सरकार बनविण्यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून सत्ता बनविण्याचा प्रस्ताव देण्यात आला नसल्याचे पवार यांनी सोनिया गांधींना म्हटले. त्यामुळेच, सोनिया गांधींनी समर्थनाचे पत्र शिवसेनेला देण्याचा निर्णय लांबणीवर ढकलला, अशी माहिती आहे.
तत्पूर्वी, राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे. परंतु पत्र देण्यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रानं काहीही झालं नसतं. आम्हीदेखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्यानं दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असं पवार यावेळी म्हणाले.
तर दसुरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भारतीय जनता पक्षानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान,परंतु सत्तास्थापनेबाबत अजूनही काँग्रेसचा निर्णय न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सत्तास्थापनेबाबत आमचा निर्णय झाला आहे. आम्ही काल दिवसभर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. पण काँग्रेसने कुठलाही निर्णय घेतला नाही. यावर आमची काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली आहे. यामुळे आम्ही एकटे निर्णय घेऊ शकत नाही, असं अजित पवार यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं