सहकारी-विरोधक एकवटले? आम्हाला साथ देणाऱ्या सर्व पक्षांचे आभार मानतो: शरद पवार

मुंबई: बँक घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं खुद्द पवार यांनी आज स्पष्ट केलं.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं शरद पवारांसह ७० नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल झाल्यानं पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही संघर्षाचा पवित्रा घेतला होता. राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसंच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.
कालच्या २४ तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं की, आज मी ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्या बँकेत मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे. त्यामुळे मी चौकशीपासून पळ काढतोय असं अर्थ निघू नये, जनमानसात प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहे. ईडीने कळविलं की तुम्ही याठिकाणी यायची गरज नाही, तूर्तास कोणतीही चौकशी नाही असं स्पष्ट केलं. मुंबई पोलिसांनीही भेट दिली. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया शहरात, जिल्ह्यात दिसायला लागली आहे. मुंबईबाहेर लोकांना अडवलं जात आहे. या सर्व गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. मी स्वत: गृह खातं सांभाळलं आहे. माझ्या कोणत्या कृतीमुळे लोकांना त्रास होईल असं मी वागणार नाही त्यामुळे मी ईडी कार्यालयात जाणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांचे, आम्हाला साथ देणाऱ्या प्रादेशिक पक्षांचे आभार मानतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं