उस्मानाबाद: पवार कुटुंबीय देखील शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई : एनसीपीला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. एनसीपीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. बडे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याने पवार कुटुंबाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. राणा जगजितसिंह हे आजारी असल्याने शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. कोल्हापूरमधील एनसीपीचे माजी खासदार धनंजय महाडिक ३१ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र #शिवस्वराज्य यात्रेला भरभरून प्रतिसाद देतोय! pic.twitter.com/YManr8u6mR
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) August 26, 2019
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव न घेता, बोचरी टीका केली. राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठ फिरवल्याचा संदर्भ घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षावरही जोरदार टीका केली. लोकांची दिशाभूल करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली आहे. देशातील नव्हे जगातील सर्वात श्रीमंत पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीकास्र सोडले. तसेच आपण राहुल मोटे यांना हाताच्या फोडाप्रमाणे मागच्या तीन वेळा सांभाळले. त्यामुळे यापुढेही त्यांना सांभाळा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
एकीकडे राहुल मोटे यांच्यासारखा उमेदवार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणारा नेता आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे. पाच वर्षे आम्ही तुम्हाला सांगत होतो, नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता. जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली. परंतु त्यावेळी तुम्हाला आमचे चुकीचे वाटत होते, मात्र आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. कारखाने, कंपन्या बंद पडले आहेत. दोन कोटी युवकांनी जे इंजिनिअिरग, डॉक्टरेट केलेले आहेत त्यांनी ६४ हजार जागांसाठी अर्ज केले आहेत. ही या देशाला मोदींची देण आहे, असाही आरोपही पाटील यांनी केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं