२००९-२०१४ मध्ये फक्त जाहिरातीत माउलीच्या समस्या समजून घेतल्या; उद्यापासून पुन्हा 'माउली संवाद'

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्ष पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने साहजिकच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला होता. आदेश बांदेकर हे शिवसेनेत सध्या सचिव या पदावर असून, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले होते.
दरम्यान पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी एका ऑडिओ क्लिपचा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आदेश बांदेकरांनी सुद्धा लक्ष केलं होतं. कारण त्याच ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं, ते आदेश बांदेकरांनी वाचून दाखवलं होतं. आदेश बांदेकर यांनी वाचून दाखविले होते की, “ही ऑडिओ क्लिप मी पाहिली नाही. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘भावोजी की कोण ते, शिवसेनेचे नेते, काय नाव त्यांचं? बांदेकर. हो ती क्लिप बांदेकरांनी वाचून दाखवली. मी मनात म्हटलं, अरे मित्रा तू सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहेस. जनाची नाही , निदान मनाची तरी ठेव. सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहे , किमान अध्यक्ष असेपर्यंत तरी खरं दाखव. पूर्ण दाखव. अर्धवट दाखवू नको. पण तो तरी काय करणार, छोटासा माणूस आहे. आदेशच नाव आहे, येतील तेवढ्याच आदेशाने काम करतो.” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.
तत्पूर्वी आदेश बांदेकरांनी दादर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, परंतु त्यावेळी ते मनसेचे तत्कालीन उमेदवार नितीन सरदेसाई यांच्या विरुद्ध लढताना पराभूत झाले होते. दरम्यान, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश’ यात्रा सुरू झाली असताना आता शिवसेनेचे सचिव आणि ‘भाऊजी’ फेम आदेश बांदेकर यांची उद्यापासून ‘माऊली संवाद’ यात्रा सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी आणि समाजातील सर्वच घटकां पर्यंत पोहोचण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने माऊली संवाद यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. सचिव असलेल्या आदेश बांदेकर यांच्या खांद्यावर सेनेने ही जबाबदारी टाकली असून ते माऊली संवादामार्फत राज्यातील महिलांशी संवाद साधणार आहेत. उद्या २ ऑगस्टपासून या माऊली संवादाला सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी भागाची यासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २ ऑगस्टला पालघर तर तीन ऑगस्टला भिवंडीत जाऊन आदेश बांदेकर माऊली संवादातून महिलांशी संवाद साधणार आहेत. ४ ऑगस्टला बीड या ठिकाणी माऊली संवाद यात्रा पोहोचणार आहे. या ठिकाणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे माऊली संवादमध्ये सहभागी होतील, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
आदेश बांदेकर यांचा टिव्हीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रमामार्फत महिलांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आणि त्याचाच फायदा निवडणुकीत करून घेण्याचं शिवसेनेने निश्चित केले आहे. महिला वर्गाची या कार्यक्रमाला पसंती असून राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘माऊली संवाद’ यात्रेची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्याकडे सोपवली आहे.
तत्पूर्वी म्हणजे २००९ ते २०१४ मधील निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने केवळ जाहिरातीतच माऊलीच्या समस्या समजून घेणारे भावोजी शिवसेना सत्तेत आल्यावर महागाईने होरपळणाऱ्या माऊलीच्या समस्या समजून घेण्यासाठी कधी फिरकलेच नाही. स्वतःच्या व्यावसायिक प्रसिद्धीचा मात्र त्यांनी पुरेपूर फायदा उचलून शिवसेनेत स्वतःच प्रस्त निर्माण केले आहे. डॉ. अमोल कोल्हे देखील आदेश बांदेकरांच्या मध्यस्तीनेच शिवसेनेत आले होते आणि कालांतराने बाहेर पडून राष्ट्रवादीत सामील झाले होते. सत्तेत असून देखील मागील ५ वर्ष शिवसेनेने राज्यातील माऊलींसाठी नेमकं काय केलं याचं उत्तर आदेश बांदेकरांकडे नसणार हे निश्चित, मात्र २००९ आणि २०१४ प्रमाणे ते पुन्हा राज्यातील माउलींना भावनिक साद घालून सेनेला मतदान करण्याची जवाबदारी सालाबादाप्रमाणे अचूक पार पाडतील यात अजिबात शंका नाही. मात्र त्या सामान्य घरातील माउलींच्या घरातील जमाखर्च महागाईमुळे शिवसेनेच्या सत्ताकाळात कसा बिघडला यावर ते काही संवादात काही बोलतील का ते पाहावं लागणार आहे.
#VIDEO : आदेश बांदेकरांच्या त्या माउलींशी संबंधित अनेक जाहिरातींमधील एक जाहिरात खाली दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं