शिवसेना दसरा मेळावा, 'निष्ठा विरुद्ध नाश्ता' लढाईत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत असल्याने तिथेच भविष्यकाळ स्पष्ट होतोय

Shivsena Dasara Melava | ३० ऑक्टोबर १९६६ या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पडला. १९ जानेवारी १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यानंतर आलेला हा पहिलाच दसरा मेळावा. त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना साथीला घेऊन दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. जाहीर सभा, मेळावे याऐवजी शिलंगणाचं सोनं लुटण्याचं निमंत्रण मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी दिलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… कुणाच्या सभेला होणार गर्दी? असा प्रश्न गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. अखेर अवघ्या काही वेळातच याचं उत्तर मिळणार आहे. दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार ताकद लावण्यात आलीये. सध्या दोन्ही सभांच्या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरूवात झाली असून, सध्या दोन्ही मैदानावर काय सुरू आहे याची उत्सुकता सर्वत्र आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी खाण्याची खास सोय करण्यात आली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमधून फुड पॅकेट ऑर्डर करण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून प्रशांत कॉर्नरला तब्बल अडीच लाख फुड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. या फुड पॅकेटमध्ये कचोरी, गुलाबजाम, खाकरा यांच्यासह अन्य पदार्थही या फुड पॅकेटमध्ये असतील. शिवाय बीकेसीत पुलाव, पुरी भाजी ते वडापाव अशी सर्व सोय येणाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. मात्र राज्यभरातून शिवाजी पार्ककडे येणारे शिवसैनिक मात्र स्वतःचे पैसे खर्च करून शिवसेनेच्या प्रेमापोटी मुंबईत धडकले आहेत असं चित्र असल्याने ही लढाई ‘निष्ठा विरुद्ध नाश्ता’ अशी असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिवाजीपार्कची गर्दी ही निष्ठावंतांची असेल तर बीकेसीतील गर्दी ही ‘नाश्ता’साठी असेल हे पत्रकार सुद्धा अनुभवत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shivsena Dasara Melava Shivsanik spending own money to attend Shivsena rally at Shivajipark check details 05 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं