सेनेचे आमदार फुटू नये म्हणून प्रत्येक आमदारावर विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखाची नजर

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या १४४ जागांपासून भारतीय जनता पक्ष मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शिवसेना आपल्या आमदारांना हॉटेल ट्रायडंट इथं हलवण्याची शक्यता आहे. तसंच याआधीही शिवसेनेनं आपल्या काही आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती आहे. नवीन आमदारांना पैशाचं आमिष दाखवून भारतीय जनता पक्ष आपल्याकडे खेचेल, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेना आमदार फुटू नये यासाठी एका आमदारामागे एक विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमदारांना कोण भेटतं, कोणाचे फोन येतात, काय बोलणं होतं याकडे हे जबाबदार शिवसैनिक बारीक लक्ष ठेवणार आहेत. तसेच याची माहिती थेट मातोश्रीवर देण्यात येणार असल्याची योजना करण्यात आलेली आहे. ज्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात येणार आहे त्याठिकाणी शिवसेनेच्या कामगार युनियनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेचे कोणतेही आमदार फुटणार नाहीत, तसेच आमच्या आमदारांच्या आसपास फिरकायचीही हिंमत कोणाची नाही असा इशाराच संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
दरम्यान, अस्थिर परिस्थितीत यंत्रणा हाती असलेल्यांकडून फोडाफोडीचे प्रयत्न होतात. मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेना आमदारांच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर शरसंधान करत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बनावे, त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत. आमचे त्यांच्याशी कोणतेही व्यक्तीगत भांडण नाही. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनण्याऐवजी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बनावे असे आमचे म्हणणे मुळीच नाही, या सगळ्या अफवा आहेत, असेही राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची चर्चा का होत नाही, हा डेडलॉक कशासाठी, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, शिवसेना कधी कोणताही डेडलॉक ठेवत नाही, चाव्या वगैरे ठेवत नाही. शिवसेनेकडे फक्त एकच चावी आहे. आणि ती म्हणजे सत्याची चावी, असे सांगत राऊत यांनी भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही, या कडे उंगुलीनिर्देश केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असेलेल्या संबंधांबाबतही आपलं मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री आणि आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. या गोष्टींमुळे आमच्या व्यक्तीगत संबंधात कोणतीही बाधा येणार नाही. हा राजकीय प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याशी निगडीत आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं