VIDEO: महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे भाष्य करणा-या तानाजी सावंतांना उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपद

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले.
रविवारी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसनेच्या २ आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात, विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांचा समावेश आहे. सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे वक्तव्य करणा-या व्यक्तीला जर मंत्रिमंडळात संधी मिळत असेल तर, महाराष्ट्राचे यापेक्षा मोठ दुर्दैव कोणते अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
२०१७ मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान, ‘सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसे काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय. पण तसे काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही,’ असे सावंत म्हणत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांचावर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा झाली होती. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊन्ट वरून सावंत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे.
काय आहे नेमका तो व्हिडिओ?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं