ED, CBI भाजपचे कार्यकर्ते आहेत का? रामजन्म भूमी खरेदी घोटाळ्याची चौकशी करावी - संजय राऊत

मुंबई, २५ जून | केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयकडून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय़ या केंद्रीय यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत का? असा खोचक टोला लगावला आहे. तसेच जर या संस्थांना तपासच करायचा असेल तर त्यांनी राम जन्मभूमी मंदिर टस्टच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.
संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारकडून या यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्र आणि पंश्चिम बंगालमधील नेत्यांना त्रास दिला जात आहे. मात्र, ईडी, सीबीआय या यंत्रणांनी जर तपास करायचाच असेल तर राम जन्मभूमीच्या जमीन खरेदी संबंधी अयोध्येचे महापौर आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने हा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना देखील या तपास यंत्रणांचा वापर करून मानसिक त्रास दिला जात असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Shivsena MP Sanjay Raut demands inquiry of Ram Janmabhumi Temple land scam by ED and CBI news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं