आमचे शाखाप्रमुख बोलतील | केवळ ३ शब्दात प्रसाद लाड यांना लायकी दाखवली

मुंबई, ०१ ऑगस्ट | वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू’ या विधानावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. हे विधान केल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर लाड यांनी रात्री उशीरा आपल्या विधानावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
प्रसाद लाड यांनी केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या याच वक्तव्याचा शिवसेना नेते चांगलाच समाचार घेत आहेत. अशावेळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली.
काय म्हणाले संजय राऊत?
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारलं असता, त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता त्यांना अनुल्लेखाने मारलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Shivsena MP Sanjay Raut slams BJP MLA Prasad Lad news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं