आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते | आडवे येणाऱ्यांना आडवं करून....

मुंबई, २६ नोव्हेंबर: ‘आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते. आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार या महिन्यात एक वर्ष पूर्ण करत आहे (MahaVikas Aghadi government has completed one year). त्या निमित्तानं ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Saamana Executive Editor took a interveew of CM Uddhav Thackeray) यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच राऊत यांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. उद्या प्रसारित होणाऱ्या या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर (Shared Promo of Interview on Twitter) केला आहे.
ऊद्या..
Tomorrow…
धमाका.. pic.twitter.com/IFTvYb1eAF— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. 44 सेकंदांचा हा प्रोमो आहे.
News English Summary: ‘The challenge is that I get more inspiration. Maharashtra will move forward by blocking those who come horizontally, ‘Chief Minister Uddhav Thackeray has warned. There is a lot of discussion about who this warning is for and who exactly has Chief Minister Thackeray’s cash. Raut has shared the promo of this interview which will be aired tomorrow from his Twitter account.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut tweeted promo of interview with Chief Minister Uddhav Thackeray News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं