उद्धव ठाकरे आज 6 वाजता थेट जनतेशी संवाद साधणार | स्व. बाळासाहेबांची शिवसेना संपवू पाहणाऱ्यांना चोख उत्तर देणार

Shivsena Party Symbol | निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक जवळपास दीड तास सुरू होती. या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत.
शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट :
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करताना त्यांची समजूत काढावी असे आवाहनही ठाकरे यांनी केले असल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी सहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधणार आहेत.
या बैठकीनंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला :
आम्ही सगळे जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. जो काही निर्णय झाला आहे. जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. परंतु, माझ्या सुचना आहे, आपल्या लोकांना संयम बाळगावा. उद्धव ठाकरे लवकरच जनतेशी संवाद साधणार आहे. निवडणूक आयोगाने आमचे सर्व मार्ग बंद केले. जनतेच्या न्यायालयात आमचा फैसला होईल, निवडणुकांमध्ये जनता न्याय देईल, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असल्याचं जाणवतंय, अनेक शिवसैनिकांना रडू आवरत नाही. जनतेला संयम बाळगायला सांगा असा उद्धव ठाकरे यांचा संदेश आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
पर्यायी चिन्ह आणि पक्षाचं पर्यायी नाव निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. पर्यायी चिन्ह पोहोचवण्यासाठी आज 2 पर्यंतची मुदत होती आमच्याकडून चिन्ह पोहचवण्याचे काम झालं आहे. बघू निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो, असंही जाधव म्हणाले.
आज संध्याकाळी 6 वाजता जनतेशी संवाद साधणार :
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. ‘जनतेला संयम बाळगायला सांगा’ असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच, उद्धव ठाकरे हे फेसबुकच्या माध्यमातून आज संध्याकाळी 6 वाजता जनतेशी संवाद सुद्धा साधणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shivsena Party Symbol Shivsena Chief Uddhav Thackeray will communicate with peoples today check details 09 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं