नोटाबंदीचे श्राद्ध घालणारी शिवसेना आज मोदींच्या एवढ्या प्रेमात का? सोशल व्हायरल

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर भारतातील सामान्य माणूस थोडा आनंदी आणि थोडा त्रासलेला दिसला. आनंदी यासाठी कि भारतातला श्रीमंतांकडे असलेला काळा पैसा बाहेर येईल असं त्यांना वाटलं होतं, आणि त्रास यासाठी कि लोकांना तासंतास फक्त २००० रुपयांसाठी रांगेत उभे रहावे लागले.
नोटबंदीला विरोध म्हणून भारतातील सर्व राजकीय पक्ष एकवटले त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, मनसे सारखे अनेख स्थानिक पक्ष आहेत. उद्धव ठाकरेंनी तर सत्तेत असून देखील नोटबंदीला प्रचंड विरोध केला होता. इतकंच काय तर वर्षभराने शिवसेनेनं नोटबंदीचे प्रथम वर्षश्राद्ध देखील घातलं आणि आपला नोटबंदीवरचा विरोधाचा सूर कायम ठेवला.
परंतु आज जर आपण शिवसेनेची मोदी समर्थनाची भूमिका पहिली तर तेव्हाचे उद्धव ठाकरे खरे कि आताचे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. काल पर्यंत चौकीदार चोर है म्हणणारे उद्धव ठाकरे आज मोदींच्या इतक्या प्रेमात का? असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. सामान्य शिवसैनिकांकडून शपथ घेऊन एकटे लढू पण अफझल खानाशी म्हणजेच भाजपशी युती करणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पंढरपूर येथील सभेत शिवसैनिकांना दिली होती.
लोकसभा निवडणुकांच्या आधी आपली कठोर भूमिका बदलून भाजपशी युती करून उद्धव ठाकरेंनी राजकारणात गरजेनुसार आणि बदलत्या वेळेनुसार भूमिका कशी बदलावी याचं जणू प्रात्यक्षिकच महाराष्ट्राला दिलं. परंतु काही राजकीय जाणकारांच्या मते जर उद्धव ठाकरेंनी हि भूमिका घेतली नसती तर शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेले असते आणि शिवसेनेला उतरती कळा लागली असती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं