लातूरकरांना पाणी यंदा ही व्याकुळ करणार.

लातूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची एकूण सरासरी घटल्याने संपूर्ण जिल्ह्यात आतापासूनच पाण्याची पातळी कमालीची खालावत चालली आहे. सर्वच गाव खेड्यात विहिरींनी आता पासूनच तळ गाठला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात गेल्या वेळे प्रमाणे यंदाही बोअरवेल्सचा खडखडाट सुरू झालाय आणि पाणी – बानी सारखी स्थिती संपूर्ण लातूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी १११० मिमी इतकी पावसाची नोंद हवामान खात्याने नोंदविली होती आणि जिल्ह्याचं वार्षिक पर्जन्यमान सरासरी ८०२मिमी आहे. परंतु जिल्ह्यात यंदा ७७१ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाल्यामुळे भूगर्भातला पाणीउपसा वाढून जानेवारी महिन्यातच प्रचंड पाणीटंचाईची निर्माण झाली आहे. इतर राज्यातून बोअरवेल खणणाऱ्या मशिन्स ने इथे पेव धरलंय, आणि २०० मीटरपेक्षा जास्त खोल बोअरवेलची खुदाई करता येत नाही नियम अक्षरशा धाब्यावर बसवून सर्रास 200 मीटरपेक्षा जास्त तब्बल ५०० ते ७०० मीटरपर्यंत खोलवर बोअरची खोदाई केली जातेय.
जिल्ह्यातली भूजलपातळीदेखील चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे आणि त्यात नव्यानं खणल्या जाणाऱ्या बोअरवेल्सनी भूजल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. सध्याची स्थिती पाहता लातूर जिल्हा पाणी – बानी च्या दिशेने जात आहे हे नक्की.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं