आमचा कॅप्टन ठरलाय! मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊंकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपचे सहकारी पक्ष देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून लक्ष करू लागले आहेत. त्याचच भाग म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. विधानसभेसाठी ‘आमचा कॅप्टन ठरलाय’ असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री विचार सोडून द्यावा असंच अप्रत्यक्ष म्हटलं आहे. याआधी भाजपातील गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. मात्र आता भाजपचे सहकारी पक्ष देखील उद्धव ठाकरेंना लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयरी सुरु केली आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भारतीय जनता पक्षात शाब्दिक चकमकी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय. येणारी विधानसभा निवडणूक आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेनाच बाजी मारेल आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील, असेही त्यांनी म्हंटले.
सांगली जिल्ह्यातील विकासकामांसाठी सात कोटी मंजूर केल्याप्रकरणी गावकऱ्यांकडून सदाभाऊ खोत यांची उंटावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर खोत यांनी प्रसार माध्यमांशी मुक्त संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं