Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
शिवसेनेचा पेशंट कार्यकर्ता रात्री R R हॉस्पिटलला येतो त्यानंतर कट शिजतो – सविस्तर | शिवसेनेचा पेशंट कार्यकर्ता रात्री R R हॉस्पिटलला येतो त्यानंतर कट शिजतो - सविस्तर | महाराष्ट्रनामा – मराठी
29 April 2025 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

शिवसेनेचा पेशंट कार्यकर्ता रात्री R R हॉस्पिटलला येतो त्यानंतर कट शिजतो - सविस्तर

Corona Crisis, Covid 19, MNS MLA Raju Patil

कल्याण-डोंबिवली, २५ एप्रिल: आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत २३ एप्रिलपर्यंतच्या आकेडवारीनुसार करोनाचे १२४ रुग्ण असून तीन मृत्यू झाले आहेत. मात्र सध्या राजकीय दृष्ट्या मनसेचे आमदार यांना मिळत असलेली प्रसिद्धी विरोधकांना पाहावत नसल्याची चर्चा रंगली आहे. रुग्णालय आणि महापालिकेत झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) महापालिकेने ही सुविधा BAJ Symbiotic Pvt Ltd. कडून भाडेतत्वावर घेतली आहे. जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत हा करार वैध असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

यावरून स्थानिक विरोधक मनसेचे आमदार राजू पाटील यांना लक्ष करत असल्याचं समोर आलं असून त्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातं आहे. त्यावर आमदार राजू पाटील यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित २४ मार्च रोजी आयुक्तांना भेटलो, तेव्हाच ४ हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत डोंबिवलीतील पेशंटची वाताहात होऊ नये असा हेतू होता. त्यात जो करार सगळया हॉस्पिटल संदर्भात झाला तोच माझ्यासाठी लागू झाला. मग केवळ आर.आर. हॉस्पिटलच करार झाला आहे. तो व्हायरल करण्याचा शिवसेनेचा हेतू चांगला आहे का? अजून ते भाड्यापोटी १० लाख रुपये आले पण नाही, ते आल्यावर मी काय करायचे ते बघणारच आहे. त्यातच शिवसेनेचा कार्यकर्ता असणारे पेशंट मध्यरात्री आर.आर. हॉस्पिटलला येतात, तिथल्याच गैरसोयीच पोस्ट व्हायरल होते, आणि एकदम ते पुन्हा न्यूऑन हॉस्पिटलला शिफ्ट होतात हे राजकारण केवळ आमची बदनामी करण्यासाठी.

हॉस्पिटलला महापालिकेला देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भाड्याची मागणी करण्यात आली नाही. केडीएमसीकडून महापालिका क्षेत्रात प्रत्येक हॉस्पिटलमधील ५-१० बेड्स शोधण्याचं सुरु होतं. तेव्हा मार्च महिन्यात मी आर आर हॉस्पिटल देण्याची तयारी दाखवली. मात्र आमच्या हॉस्पिटलपूर्वी केडीएमसीने अन्य एका हॉस्पिटलशी करार केला होता. तोच फॉरमॅट केडीएमसीने आर.आर हॉस्पिटला लावला. मी तो करार पाहिलेलाही नाही. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याकडून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली असावी पण मी चांगल्या हेतूने आणि विश्वासाने हॉस्पिटल महापालिकेला दिलं होतं असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.

तसेच कोरोनाच्या संकटातही काही लोक राजकारण करत आहेत. जर मला व्यावसायिक भाडेस्वरुपात हॉस्पिटल द्यायचं असते तर मी १० लाखांपेक्षा जास्त दिलं असतं. १० लाख काहीच नाहीत. इतकचं नाही तर मी स्वत: २५ लाखांहून जास्त खर्च करुन धान्य आणि जीवनावश्यक वस्तू लोकांना पोहचवत आहे. मला स्वत: हॉस्पिटल चालवायचं असतं तर १० लाखांहून जास्त कमावले असते असंही राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: According to the health department, there were 124 coronary patients in Kalyan-Dombivali as on April 23, with three deaths. However, there is talk that the opposition is not seeing the publicity that MNS MLAs are getting politically at present. As per the Memorandum of Understanding (MoU) between the hospital and the corporation, the corporation has provided this facility to BAJ Symbiotic Pvt. Ltd. Is leased from. It has been made clear that the agreement will remain valid until the corona is brought under control.

News English Title: Story Kalyan Dombivli MNS MLA Raju Patil has given clarification on RR Hospital Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

x