खाजगी कर्मचाऱ्यांना घरबसल्या पूर्ण पगार द्या; अन रस्त्यावर जीव धोक्यात तरी पगार कपात?

मुंबई, ३१ मार्च : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
मात्र सरकारच्या निर्णयांना देखील कोरोनाची लागण झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी खाजगी कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार द्या असे निर्णय घेऊन चांगला संदेश दिला, मात्र दुसऱ्या बाजूला स्वतःला कुटूंब असताना देखील जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार देखील मोठ्या प्रमाणावर कापण्यात येणार हे स्पष्ट झाल्याने ठाकरे सरकार या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मानसिक आणि आर्थिक तणावात ढकलणार हे देखील स्पष्ट झालं आहे. त्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी असं देखील बोलून दाखवलं की, आम्ही कोरोनाची लागण होऊन रस्त्यावर मरू, पण निदान आम्हा पोलीस शिपायांचा, हवालदारांचा आणि अंमलदारांचा नेमका पगार किती तो मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी समजून घ्यावा. कारण २५-३० टक्के पगार कपात झाल्यावर आम्ही घराचा महिन्याचा किराणा माल देखील भरू शकणार नाही. त्यात इतर खर्चांमुळे आमच्या घरातील गृहिणी आर्थिक चणचण झाल्याने मानसिक तणावात जातील.
आम्ही मागील आठवडाभर रस्त्यावरील गरिबांना स्वतःहून मदत करून ते भुकेले राहणार नाहीत याची काळजी घेत आहोत. पण हे सरकार तर आमच्या कुटूंबियांना देखील उपाशी मारायला निघालंय अशी संतप्त भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे उद्या पोलीस संतापले आणि सवरती झाले आर काय होईल याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. दान द्यावं आणि दान करावं आम्हाला देखील माहित आहे आणि त्यासाठी आम्ही मागील ७ दिवस रस्त्यावर तेच करत आहोत असं देखील अनेकांनी सांगून आमदार खासदार काय करत आहेत असं देखील विचारलं आहे.
दरम्यान, यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “स्वतःचा जीव धोक्यात घालून २४ तास राबणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांचे पगार कसले कापता, उलट त्यांना अधिक पैसे प्रोत्साहन म्हणून द्यायला हवे… झालं तर आमदारांचे पगार १०० टक्के कापा असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मात्र वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराचा खर्च भागाने देखील कठीण होणार यात शंका नाही. परंतु सरकारने पत्रकार परिषदेत कामाची स्तुती करताना आम्हाला आमच्या घरचा महिन्याचा किराणामाल सुद्धा खरेदी करता येणार नाही हे आधी लक्षात घ्याल हवं असं अनेक पोलिसांनी मत व्यक्त केलं आहे.
News English Title: Story Maharashtra Police Employees not happy with State Govt Decision about salary deduction over Corona crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं