विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई, ३० एप्रिल: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका लवकर जाहीर करा या आशयाचं एक पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठीच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर कराव्यात” अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची तारीख काय असेल ते जाहीर करण्यात आलेलं नाही. आता लवकरात लवकर या निवडणुकांची तारीख जाहीर करा असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे विषेश मार्गदर्शनाखाली या निवडणूका घेता येतील, असा उल्लेख राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये केलाय. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करावी, याची शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी राज्यपालांकडे केली होती. यासंदर्भात निर्णय घेण्यापेक्षा राज्यपालांनी उद्धव ठाकरेंसमोरील पेच सोडवण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवल्याचे पाहायला मिळते.
विधान परिषदेच्या या रिक्त जागांसाठी एप्रिल महिन्यातच निवडणूक होणार होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. मात्र, ही निवडणूक घ्याण्यात यावी, यासाठी शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २७ मे २०२० पूर्वी विधान परिषदेवर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.
News English Summary: Governor Bhagat Singh Koshyari has requested the Election Commission of India to declare elections for 9 vacant seats in the state Legislative Council. On April 24, nine seats in the state Legislative Council fell vacant.
News English Title: Story Maharashtra state governor Bhagat Singh Koshyari requests election commission to declare elections for 9 vacant Coucil seats in State News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं