मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंची कारवाई

औरंगाबाद : ‘आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे,’ असं म्हणत औरंगाबाद दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाई केल्याने मनसे पदाधिकारी गौतम अमराव यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही काढून घेण्यात आली.
औरंगाबादमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातील अंतर्गत बातम्या पसरवण्याचा संशल गौतम अमराव यांच्यावर होता. तसेच पक्षादेश न पाळल्याने गौतम यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी पक्षाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला होता. पक्षातील अंतर्गत बातम्या फोडल्याचा संशय होता. त्यानुसार, राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. त्या इशाऱ्यानुसारच मनसेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Web Title: Story MNS Chief Raj Thackeray sacked Aurangabad City Party President Gautam Amrao.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं