Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
मनसे संभाजीनगरमध्ये करणार ‘भगवं शक्तिप्रदर्शन’; स्वतः राज ठाकरे सहभागी होणार? | मनसे संभाजीनगरमध्ये करणार 'भगवं शक्तिप्रदर्शन'; स्वतः राज ठाकरे सहभागी होणार? | महाराष्ट्रनामा – मराठी
2 May 2025 6:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

मनसे संभाजीनगरमध्ये करणार 'भगवं शक्तिप्रदर्शन'; स्वतः राज ठाकरे सहभागी होणार?

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad, Sambhajinagar, Shiv Jayanti

औरंगाबाद: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली होती. तसेच तिथीनूसार देखील शिवसेना शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते. मात्र मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी १२ मार्चला तिथीनूसार शिवजयंती साजरी करणार आहे. तसेच राज ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती. मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला होता. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं होतं.

राष्ट्रवादीच्या या आवाहनानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला होता. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे, एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मिटवून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

शिवजयंतीच्या या तारखेवरुन शिवसेना आणि अन्य मराठा संघटनांमध्ये औरंगाबाद येथे मारहाणीचा प्रकारही घडला होता. शिवजयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार साजरी केली जात असताना शिवसेना नेत्यांकडून तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याचा घाट घातला जातो. हा शिवरायांचा अवमान आहे, त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं बंद करावं अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली होती.

शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. भारतीय जनता पक्षासोबत युती असताना देखील शिवसेनेने वारंवार शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत आहे. तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं असल्याने एकमेकांच्या मागण्या तसंच भावनांचा आदर राखण्याचा तिन्ही पक्ष पुरेपूर प्रयत्न करावं लागत असल्याने शिवसेनेची मोठी अडचण होताना दिसते.

 

News English Summery: From this date, Shiv Sena and other Maratha organizations were also attacked in Aurangabad. While Shiv Jayanti is being celebrated on the date of February 19th, Shiv Sena leaders have decided to celebrate the birth anniversary by announcing their birth anniversary. This is a contempt of Shivaji, so MLA Nitesh Rane demanded that the Shiv Jayanti be stopped as per the date. Shiv Sena celebrates Shiv Jayanti every year as per the date. After the formation of Shiv Sena, Nationalist Congress and Congress government in the state, Uddhav Thackeray urged Chief Minister Uddhav Thackeray to release the date and declare Shiv Jayanti date on February 19. After this, Uddhav Thackeray celebrated Shiv Jayanti on February 19, according to the official date. The Shiv Sena had made it clear that Shiv Sena would celebrate Shiv Jayanti as per the date. However, MNS will be celebrating Shiv Jayanti as per the date on March 12 to arrest Shiv Sena in Political Trap. Also, it is said that Raj Thackeray himself will show strength in Aurangabad.

 

Web News Title: Story MNS chief Raj Thackeray will celebrate shiv Jayanti as per Marathi Calendar on 12 March at Aurangabad.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

x