भाजपाचे लोक जसे मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत: रोहित पवार

उस्मानाबाद: भारतीय जनता पक्षाचे लोक जसं मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी मंगळवारी माफी मागितली आहे. त्यामुळे फार खोलात जाण्याची गरज नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य केलं त्यामागे त्यांचा काय हेतू होता? हे तपासलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबद येथे ते बोलत होते.
एकीकडे रोहित पवार यांनी महाराजांचं समर्थन केलं आहे पण या प्रकरणाची चोकशीही झाली पाहिजे असं ते म्हणाले. ‘इंदोरीकर महाराजांची कीर्तन करण्याची पद्धत सोपी असते. व्यसनमुक्ती सारखे काम ते करतात, त्याच बरोबर ते असे बोलले आहेत का? त्यांचा हेतू काय होता हे तपासले पाहिजे’, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, उस्मानाबाद इथं बोलताना रोहित पवार यांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मिश्किल टीकाही केली. ‘ते कितीही मोठ्याने ओरडले तरी ते फक्त आणखी वर्षभर ओरडतील. वर्षानंतर त्यांचे कोणीच ऐकणार नाही. त्यांची ओरड फक्त आमदार आणि कार्यकर्ते फुटू नये यासाठी आहे,’ असं म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं