मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आमच्यात रमले आहेत: शरद पवार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिलं. सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असं सांगतानाच करतानाच काही मदत लागली, माझी गरज पडली तर उभं राह्यचं. यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार पाच वर्षे टिकेल याची शाश्वतीही दिली. सरकारबद्दल मला स्वतःला शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे संमिश्र सरकार असून हे सरकार ५ वर्षे चालेल असा आत्मविश्वास पवारांनी व्यक्त केला.
तर काही गोष्टी शिकायच्या असतात बाहेर उघड करायच्या नसतात, शिवसेना म्हणून आमचा कधीही संपर्क आला नाही, बाळासाहेबांशी मित्र म्हणून संबंध आला, बाळासाहेबांमध्ये एक सभ्यता होती, आम्ही दोघे जाहीर सभेतून एकमेकांबद्दल बोलायचो मात्र जाहीर सभानंतर आम्ही एकत्र आलो की सुसंवाद चालायचा. बाळासाहेबांनी भाषणात बोलले शब्द कधीही मागे घेतले नाहीत, बाळासाहेबांचा निर्णय ठाम असायचा असं शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना सांगितले.
त्याचसोबत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काय फरक आहे असं विचारल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या निर्णयासाठी दिल्लीला जावं लागतं, केंद्रीय सत्ता आणि नेतृत्वाची विकेंद्रीकरण असल्याने अनेकदा अडचण येते, काँग्रेसने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचं दिसून येतं. हे सरकार चालवायचं ही भूमिका काँग्रेसने घेतल्याचं दिसतं, आता उद्धव ठाकरे आमच्यात रमले आहेत. असं शरद पवारांनी सांगितले.
पवार म्हणाले, महाराष्ट्र ६० वर्षांचा झालाय तर मी ८० वर्षांचा झालोय. आता या वयात नवं व्हिजन काय पाहणार. मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम मी करतोय. कारण नवी पिढी पुढे गेली पाहिजे त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे. मी आता तेच करतोय. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहात असतो. त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो असं पवार म्हणाले.
Web Title: Story NCP President Sharad Pawar appreciate CM Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं