पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी; सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांवर संतापल्या

औरंगाबाद: पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या राडेबाज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलीच दमबाजी केली आहे. ‘माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केला आहे. पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे,’ अशा शब्दात सुळे यांनी या गोंधळी कार्यकर्त्यांना दम भरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा झाला. दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोहोंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. औरंगाबादमधल्या पैठणमध्ये ही घटना घडली. यामुळे काही काळासाठी सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या. मात्र काही काळासाठी हा राडा झाला.
सुप्रिया सुळे या दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम, मेळावे आदींचे आयोजन केले आहे. सुप्रिया सुळेही या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान, आज औरंगाबाद येथील पैठण येथे त्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळीच संजय गोर्डे आणि धनंजय वाकचौरे यांचा गट आमनेसामने आला.
Web Title: Story Ruckus in NCP MP Supriya Sules Aurangabad Party Program.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं