ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा असताना सुद्धा तृप्ती देसाई नगरला? स्टंट असल्याचा समर्थकांचा आरोप

नगर: स्त्रीसंग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते, असे वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांचे सर्मथक देखील आक्रमक झाले असले तरी इंदुरीकर महाराजांनी त्यांना कोणतीही आक्रमक भूमिका घेत आंदोलनं कर नका अशी विनंती केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या समर्थकांनी आरोप केला आहे की, कोणाबद्दलही तक्रार करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असताना देखील तृप्ती देसाई नगरला केवळ स्टंट आणि प्रसिद्धीसाठीच येत आहेत असा आरोप केला आहे.
तत्पूर्वी, तुप्ती देसाई यांनी देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध करत इंदुरीकर महाराजांना आव्हान दिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की… इंदुरीकर महाराज मी कुठे यायचे, फक्त ठिकाण आणि वेळ सांगा….तुम्हाला समर्थन करणारे महिला आणि पुरुष मला नागडे करून मारणार आहेत, कोणी रंडी म्हणत आहे , कोणी मला कुत्री म्हणत आहे …मी माझ्या दररोजच्या ड्रेसमध्ये येईनच मग तुमच्या समर्थकांना काय करायचे आहे ते करू द्या. तृप्ती देसाई कधी माघार घेत नसते
पुन्हा एकदा सावित्रीबाईंवर झालेला अन्याय आणि द्रौपदीला काय भोगावे लागले होते ते २१व्या शतकात मलाही भोगावे लागेल तुमच्या प्रबोधनामुळे अशा धमक्या मला येत आहेत….. मी तयार आहे यायला-सौ. तृप्ती देसाई संस्थापक अध्यक्ष भुमाता ब्रिगेड.
Web Title: Story Trupti Desai will visit Nagar to log complaint against Indurikar Maharaj.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं