ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या | वीज पुरवठा खंडीत केल्याने स्वाभिमानीचं अनोखं आंदोलन

हिंगोली, १३ फेब्रुवारी: हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे गुरांच्या गळ्यात ‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’ चे फलक लाऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 13 अनोखे आंदोलन केले. यावेळी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्हयात कृषीपंपाची सुमारे ३०० कोटींच्या वर देयकांची वसुली आहे. वीज कंपनीच्या वतीने मागील काही दिवसांपासून कृषीपंपाच्या देयकाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये कृषीपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले ट्रान्सफार्मरच बंद केले जात आहे.त्यामुळे एकाच वेळी तीन ते चार गावातील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत होत आहे.
त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा व परिसरातील कृषीपंपांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्या नैत्रुत्वात आंदोलन करण्यात आलं होतं.
News English Summary: Officials of Swabhimani Shetkari Sanghatana (SFS) on Saturday hung a plaque of ‘Energy Minister give water to drink’ around the necks of cattle at Taktoda in Hingoli district. 13 made unique movements. The decision to cut off power supply to the agricultural pump has been protested.
News English Title: Swabhimani Shetkari protests against the decision to cut off power supply to agricultural pumps in Hingoli news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं