स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.
हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास १ तासांहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की राज्यात नवीन समीकरण तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान स्वभिमानीने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं