नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

मुंबई, ११ फेब्रुवारी: काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
त्यानंतर आता नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात भाजपसाठी काम केलेल्या काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. नाशकातील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. (Teachers from Nashik and office bearers of Maratha Mavla Association held the MNS flag)
नाशिकमधील शिक्षकांच्या एका समुदायाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. आधी हे शिक्षक भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होते. तसेच येवल्याच्या मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारीही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले. आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून आणू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये झंझावात सुरु होईल, अशी प्रतिक्रिया अशोक मुर्तडक यांनी दिली.
News English Summary: Some teachers who worked for BJP under the leadership of former MNS mayor of Nashik Ashok Murtadak joined Maharashtra Navnirman Sena. The party was inaugurated at Krishnakunj residence in the presence of MNS president Raj Thackeray. Teachers from Nashik and office bearers of Maratha Mavla Association held the MNS flag. The strength of the party is increasing in the face of the upcoming Nashik Municipal Corporation elections.
News English Title: Teachers from Nashik and office bearers of Maratha Mavla Association held the MNS flag news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं