कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे, पण ते सामान्यांना परवडणारं नाही - शरद पवार

सातारा, २७ जून : सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
सातारा येथे एमआय़डीसीमध्ये बजाज कंपनीकडे चाळीस एकर जागा आहे. बजाज यांनी स्वतः कंपनी सुरू करावी किंवा जागा खाली करून दुसऱ्यासाठी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान यावेळी राज्यातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेवहा ते म्हणाले की, करोना विषाणूवर इंजेक्शन निघालं आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे दिली. आपल्या देशात हे इंजेक्शन मिळत नाही. ३० ते ३५ हजार रुपये अशी इंजेक्शनची किंमत असून ते सामान्य माणसाला परवडणारं नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळ बैठक व पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आज या बैठकीला उप मुख्यमंत्री अजित पवार ही उपस्थित होते.
News English Summary: NCP president Sharad Pawar said in Satara that he had been injected with the corona virus but could not afford it. This injection is not available in our country.
News English Title: There Is A Injection On Corona Virus But You Cant Afford It Says Sharad Pawar In Satara News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं