राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; दुष्काळावर विशेष चर्चा

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर काल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात आणि आत्मविश्वासाने सत्तारुढ पक्ष या अधिवेशनाला सामोरं जात आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, विशेषतः दुष्काळावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा होईल. यावेळी १३ नवी विधेयके अधिवेशनात मांडली जातील. आपल्याकडे एकूण १५ प्रलंबीत विधेयकांपैकी १२ विधानसभेत आणि ३ विधानपरिषदेत प्रलंबित आहेत. अशी एकूण २८ विधेयकं या अधिवेशनात मांडली जाणार आहेत.
दुष्काळाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे ४७०० कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने जमा केले आहे. ३२०० कोटी रुपये विम्याचे अनुदानाचे वाटप सुरु आहे. आवश्यक तेवढ्या चारा छावण्या तयार केल्या आहेत. दरम्यान विरोधक देखील दुष्काळावरून आणि अपुऱ्या सोयीसुविधांवरून सरकारला धारेवर धरणार असल्याचे वृत्त आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आणि त्यात प्रकाश मेहता यांचावर एसआरए योजनेत मोठा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत आणि त्यामुळे हा मुद्दा देखील विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं