अक्कलकुव्वात शिवसेनेचे कार्यालय जाळले; शहरात जमाव बंदी लागू

नंदुरबार: काल राज्यात नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला होता. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले होते. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे समसमान उमेदवार निवडून आले होते.
त्यानंतर आज अक्कलकुव्वा शहरातील शिवसेनेच्या कार्यालयाला आग लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा काही अज्ञातांनी महामार्गावर असलेल्या शिवसेनेचे कार्यालय जाळले असून आज सकाळी ही बाब समोर आली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी जमाव बंदी लागू केली आहे.
बुधवारी नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यावेळी काँग्रेस आणि भाजपला समसमान मते मिळाली. मात्र शहरात महाविकासआघाडीचाच बोलबाला आहे. या निकालावरून ही घटना घडल्याची चर्चा आहे. दरम्यान, शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत दोषींना पकडण्याचा मागणी केली आहे.
Web Title: Unknown peoples burned Shivsena Nandurbar Akkalkua Shakha.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं