उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल : नीलम गोऱ्हे

मुंबई : विधानसभा निवडणूक जस जशा जवळ येत आहेत तसतशी शिवसेनेतील नेत्यांची रोज निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. अनेकांनी यापूर्वी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याबाबतर अनेक वक्तव्य केली आहेत. सामान्य मतदार निवडणुकीत कौल कुणाच्या बाजूने देणार आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंदच होईल अस वक्तव्य केले आहे.
सोलापुमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात यावे ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे मत व्यक्त करतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल असंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पुढे बोलताना उद्धवसाहेबांचा विश्वास आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राजकारणापासून उदासीन असलेला युवक आदित्य ठाकरे यांच्या कामाकडे आकर्षित होऊन येत आहे. आदित्य यांच्यामध्ये असलेल्या गुणांची ती चुणूकच आहे असे सांगतानाच राज्यातील जनतेच्या युतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असेही गोऱ्हे म्हणाल्या.
त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये युती झाली असली आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा पुढील मुख्यमंत्री होणार हे भाजपने जाहीर केले असले तरी शिवसेनेतील नेत्यांची रोज नवनवीन वक्तव्ये युतीत खोडा घालण्यासाठीच तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे जागावाटपात शेवटच्या क्षणी काय होईल ते देखील सांगता येणार नाही असं आजही अनेकांचं मत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं