साताऱ्यात घडाळ्याचं बटन दाबलं तर व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह दिसायचं

सातारा: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. मात्र जवळपास ६५ ठिकाणी ईव्हीएम संबंधित तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. आधीच देशभरात ईव्हीएम’ला अनुसरून अनेकांच्या तक्रारी असताना देखील यावेळी सुद्धा तेच प्रकार समोर आले आहेत. मात्र यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे मागील अनेक निवडणुकांमध्ये जेव्हा कोणतही बटण दाबलं जात तेव्हा ते मत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा मनसे या पक्षांना जाण्याची उदाहरणं समोर न येता, ज्या तक्रारी आल्या त्या बटण दाबल्यावर फिरणारं मत भाजपाला म्हणजे कमळाकडेच कसं वर्ग होतं हा संशोधनाचा विषय बनला आहे.
तसाच काहीसा प्रकार काल साताऱ्यात घडला आहे. काल साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान पार पडलं. परंतु, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादी पक्षाच्या घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत वर्ग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील तसा आरोप केला आहे.
साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर सदर प्रकार घडल्याचं वृत्त आहे. काल सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदारांनी एनसीपीच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मत जात असल्याचं निदर्शनास आलं. ग्रामस्थांनी सदर प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास देखील आणून दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पुन्हा पार पडले.
मात्र धक्कादायक गोष्ट यासाठी आहे कारण, ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे सुरुवातीला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परंतु, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि बाहेर गोंधळ वाढला तेव्हा निवडणूक अधिकारी प्रकरण तापू नये म्हणून खडबडून जागे झाले. त्यानंतर बाहेर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे नवले गावात काल मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण पाहायला मिळालं होतं.
ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा प्रकार मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तासांनी लक्षात आला. तोपर्यंत दोनशेहून अधिक मतदारांनी मतदान केलं होतं. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी तातडीने दखल का घेतली नाही, असा प्रश्न मतदार विचारत आहेत. तसंच आधी झालेल्या मतदानाचं काय करणार याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. या घटनेची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेणं आवश्यक आहे, अशी मागणी आता मतदार करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं