चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला मी किंमत देत नाही: उद्धव ठाकरे

मुंबई : युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचाच असल्याचे ठासून सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला किंमत देत नसल्याचे सूचित केले.
बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनीही रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव यांनी यावेळी विलास तरे यांना शिवबंधन बांधले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, युतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्येकी दोन बैठका झाल्या आहेत. दोन्ही बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या असून त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. विद्यमान ६३ आमदारांसह आणखी तेवढ्याच, साधारणपणे १२० ते १२५ जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील. १६३ ते १६८ जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना मिळतील. तर भारतीय जनता पक्ष विद्यमान १२२ आमदारांसह मित्रपक्षांसाठी १६३ ते १६८ जागांसाठी आग्रही आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे २५ ते ३० विद्यमान आमदारांना वगळणार असून नवीन चेहऱ्यांना (इनकमिंग) संधी देणार असल्याचे समजते.
दुसऱ्या बाजूला शिवसेना कोणत्याही परिस्थितीत वेगळे लढण्याच्या मानसिकतेत नाही. तसा विचार झालाच तर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडेल अथवा शिवसेनेचे काही आमदार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. मध्यंतरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘‘आपल्याकडे कोणत्याही ८० जागा द्या, मी त्या निवडून आणतो, नाही आणल्या तर मला मंत्रीपद देऊ नका’’ असे आव्हान जाहीरपणे स्वीकारले आहे. त्यावर ‘आमच्या दोन जागा जास्ती घ्या, पण आम्हाला तुमचे गिरीश महाजन द्या’, असे उद्धव ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हटले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं