मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाची आत्महत्या

गडचिरोली: मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. गडचिरोलीतील आनंद नगर याठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहे. या तिघांनीही त्यांच्या घरामागे असलेल्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११.३० च्या सुमारास यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी मुलीने आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या केली.
#गडचिरोली: मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. गडचिरोलीतील आनंद नगर याठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहेत. pic.twitter.com/9XtVuyFcf2
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) February 10, 2020
रवींद्र वरगंटीवार यांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होतं. रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील), वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली.
कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीने आपण प्रेमविवाह करणार असल्याची कल्पना घरी दीड महिन्यापूर्वी दिली होती, पण घरून विरोध होता. त्यामुळे शनिवारी ती घरून निघून गेली. पण याचा जबर मानसिक धक्का बसलेल्या वरगंटीवार कुटुंबीयांनी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास घराच्या मागील बाजूने असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेतली.
Web Title: Whole Family suicide because daughter get married with lower cast person in Gadchiroli.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं