मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने रोहिणी खडसे पराभूत झाल्या: गिरीश महाजन

जळगाव: जळगावात येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रतिउउतर दिलं आहे. महाजन म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने खडसे यांना तिकीट नाकारल्याने अधिक फरक पडला नाही.
यावेळी तिथे अटीतटीचा सामना होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष तिथे एकत्र आले होते. तसेच भारतीय जनता पक्षामधून १२ आमदार बाहेर पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या पक्षातून एकही आमदार बाहेर पडणार नाही, असा दावासुद्धा महाजन यांनी केला.
प्रत्येक निवडणुकीत मुक्ताईनगरची लढत ही अत्यंत चुरशीची असते. मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने रोहिणी खडसे पराभूत झाले. सर्व भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदारपणे खडसेंसाठी प्रचार केला होता, मात्र मुक्ताईनगरची लढत चुरशीची असल्याने पराभव झाला”, असं गिरीश महाजन म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं