ZP Panchayat Election | राजकीय आरक्षण रद्द होऊनही OBC टक्का कायम | भाजपचे दावे फोल ठरले

मुंबई, ०७ ऑक्टोबर | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द (ZP Panchayat Election) झाल्यामुळे राज्यातील ६ जिल्हा परिषदांचे ८५ गट आणि ३८ पंचायत समित्यांमधील १४४ गणांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसीच उमेदवार दिल्यामुळे ओबीसीचा टक्का कायम राहिला आहे. त्यामुळे भाजपचे दावे आणि आंदोलनाचे स्टंट फसवे ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षावर विशेष परिणाम झालेला नाही. उलट हा मतदार आजची काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मानतो हे देखील सिद्ध झालं आहे.
ZP Panchayat Election. Due to cancellation of political reservation of OBCs in local bodies, in the by-elections held in 85 groups of 6 Zilla Parishads and 144 constituencies of 38 Panchayat Samitis in the state, the percentage of OBCs has remained the same as almost all political parties have fielded OBC candidates :
जिल्हा परिषदेच्या ८५ पैकी ७८ गटांमध्ये ओबीसी उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे २२ जागा जिंकल्या आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या, तर शिवसेना चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने सर्वाधिक ३५ जागा जिंकून वर्चस्व राखले.
सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने १४ पैकी १३ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील दिले होते. त्यापैकी ओबीसी प्रवर्गातील सहा उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपचा १, काँग्रेसचा एक, शिवसेनेचा एक, प्रहार जनशक्ती पक्षाचा एक हे सर्व उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. विजय झालेला दोन अपक्ष उमेदवारांना पैकी उमेदवार मात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. वाशीम जिल्ह्यात आहे १४ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीमध्ये विजय झालेले सर्व १४ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. येथे सुद्धा सर्व राजकीय पक्षांनी ओबीसींना उमेदवारी दिली. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये १६ जागांसाठी राजकीय पक्षांनी दिलेले सर्व ओबीसी प्रवर्गातील १६ उमेदवार विजयी झाले.
हे सुद्धा वाचा – Titan Share Price | बिग बुल राकेश झुनझूनवालांचा खास शेअर Titan तुफान तेजीत | गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला १९, राष्ट्रवादी काँग्रेसला १५, तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या आहेत. १२ ठिकाणी नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत, तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून २५ टक्के जागा भाजपला, तर २५ टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या ५० टक्क्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सामावले आहेत.
हे सुद्धा वाचा – IRCTC Share Price | IRCTC’चा शेअर आठवड्याभरात 20 टक्क्यांनी वाढला | गुंतवणूकदारांना लॉटरी
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: ZP Panchayat Election OBC political reservation never impact on MahaVikas Aghadi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं