Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर | ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर | महाराष्ट्रनामा – मराठी
30 April 2025 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर

Marathi Movie, Bahirji Naik, A detective of Chhtrapati Shivaji Maharaj

मुंबई, २६ ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. त्यामुळे त्यांच्या एका एका मावळ्याच चरित्र आणि मोहिमा या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. त्यामुळे आता सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा पडद्यावर अनुभवला जातो त्यावेळी प्रेक्षकांसाठी तो रोमांच उभे करणारा अनुभव असतो. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अशा उद्धवलेल्या समस्यांचा मागोवा घेताना शूर मावळ्यांचा इतिहास उलगडत जातो आणि या दरम्यान इतिहास आपल्याला अशाच एका अज्ञात यशस्वी शिलेदाराचे नाव समोर आणतो. अर्थात या धाडसी शिलेदाराचे नाव बरेचजण ऐकून असतील, पण त्यांचे कर्तृत्व मात्र अजूनही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आढळते. हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’. अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

आई जगदंबेच्या शुभाशीर्वादाने सादर आहे ‘बहिर्जी’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर … ? ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा … या चित्रपटात दिसणार शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेतील धाडसी शिलेदाराची गाथा… ‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत . नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला रुपेरी पडद्यावर आता अनुभवता येणार आहे . #Bahirji Production House : #KaakMaayEntertainment Producer : #MandakiniKishorKakade Writer : #KiranPrakashMane Associate Producer : #Maheshkole Presented By : #MaheshKole, #PankajWadkar, #KunalKshirsagar PR & Marketing : #FreshMintMedia सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक आणि फॉलो करा काक माय एंटरटेनमेंट… #Marathi #MarathiFilm #MarathiMovie #TitlePoster #Maharashtra #Swarajya #MiMarathi #Maharashtra_ig #Marathi_ig

A post shared by Kaak Maay Entertainment (@kaakmaayent) on

नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला निर्माती मंदाकिनी किशोर काकडे सर्व सिने रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. लेखक किरण माने यांनी या चित्रपटाकरीता लेखनाची धुरा सांभाळली असून ‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती मंदाकिनी किशोर काकडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक पोस्टर प्रदर्शित झाले असून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून इतिहासामध्ये बहिर्जीना दिली गेलेली उपाधी लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहे.

 

News English Summary: The multi-faceted art creator and filmmaker Mandakini Kishor Kakade is all set to bring the saga of a brave, courageous warrior Bahirji Naik on the big screen. Bahirji Naik was an Indian spy and military commander in the army of Chhatrapati Shivaji Maharaj during a time when the Maratha Empire and Mughal Empire were at war. An official announcement about the launch of this film has been made by the makers of the film on their social networking page, by displaying first looks poster from the film.

News English Title: Marathi Movie Bahirji Naik a detective of Chhtrapati Shivaji Maharaj News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MarathiMovie(9)

संबंधित बातम्या

x