ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

सातारा, २२ सप्टेंबर : मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सातारा जिल्ह्यात सध्या ‘देवमाणूस’, ‘आई माझी काळूबाई’ अशा मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. सध्या एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने या मालिकेतील सेटवरील सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अभिनेते अशोक सराफ यांनी आशालता वाबगावकर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कलाविश्वानं एक चतुरस्त्र अभिनेत्री गमावल्याचं ते म्हणाले. नाट्य आणि चित्रपच वर्तुळात वाबगावकर यांचा वावर अतिशय उल्लेखनीय होता, असं म्हणत एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी कायमच सर्वांची मनं जिंकली असं म्हणत अशोक सराफ यांनी या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
News English Summary: Marathi actress Ashalata Wabgaonkar passed away in Maharashtra’s Satara on Tuesday. She was tested positive for COVID-19 a few days back and was reportedly critical. The veteran actor is a popular face on Marathi television, in films, and theatre. The 79-year-old actor was shooting for her mythological show titled Aai Mazi Kalubai when she was diagnosed with COVID.
News English Title: Marathi actress Ashalata Wabgaonkar passed away Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं