महत्वाच्या बातम्या
-
कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे: अब्दुल सत्तार
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं होते. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधला होता. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना २ लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.
5 वर्षांपूर्वी -
मनसे 'हिंदुत्वा'मुळे शिवसेनेला खिंडार; सुहास दाशरथेंचा मनसेत प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या मार्गाने गेल्याने शिवसेनेला धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. मनसे आता हिंदुत्वाचा अजेन्डा हाती घेणार असल्याने शिवसेनेला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबादचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांच्या सहित त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 'भगवी' झुंज देणार; ५८ जागा लढणार
एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. पक्षाने सर्व ११५ वॉर्डातून उमेदवार देण्याची तयारी दर्शवली असली तरी आजच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे ५८ वार्डातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. या वार्डातून इच्छूक असललेल्यांची यादी देखील तयार करण्यात आली असून लवकरच ती पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यामुळे या पक्षातील नाराजांना प्रवेश देऊन येणाऱ्या महापालिकेत चांगली कामगिरी करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकृतांमुळे लेकीचं जगणं असह्य! सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेला पेटवलं
महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
चोरांच्या टोळीत बसलाय की काय...म्हणून बुट हातात घेऊन भाषण? - रुपाली चाकणकर
पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना धर्मनिरपेक्ष झाल्याने मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला: खा. इम्तियाज जलील
“इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का?” असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. “धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?” असा सवाल राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात उपस्थित केला होता. तसंच राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देत, सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
केवळ मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत: अशोक चव्हाण
शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत महाविकास आघाडी’करून सत्तेत आली खरी, मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या विधानाने अधिकच राजकीय पेचात सापडत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी काँग्रेसमध्ये सर्वजण शांत झाले की खासदार संजय राऊत कोणत्या ना कोणत्या तरी विधानाने शिवसेनेची अडचण वाढवताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाचे पडसाद? खैरेंचे कट्टर समर्थक सुहास दाशरथेंचा भव्य कार्यक्रमात मनसेत प्रवेश होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या मार्गाने जाणार असल्याच्या बातम्या पसरताच शिवसेनेला धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. केवळ मराठी केंद्रित राजकारणाचा मनसेला कोणताही राजकीय फायदा झालेला दिसत नाही. सध्याच्या राजकारणाचा विचार करता सत्तेसाठी कोणतेही पक्ष एकत्र आणि पक्षाची सर्व धोरणं वेशीवर टांगून सत्ता स्थापन करत आहेत. परंतु, यामध्ये मनसेला कोणताही राजकीय फायदा होताना दिसत नाही.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाकडे संख्याबळाचं नसल्याने संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध निवडून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कट्टर राजकीय विरोधक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर
कट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा ४२ व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडतोय. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले.
5 वर्षांपूर्वी -
सरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी
सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे ९ ते १२ जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो घेण्यात आला. याचा रविवारी समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरेंचं मत
‘जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,’ असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून आ. तानाजी सावंत यांना धडा शिकविण्याची तयारी; पक्ष शिस्तीचा संदेश देणार?
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला मदत केली होती. मात्र सध्या शिवसेना त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. शिवसेना पक्ष त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पक्षविरोधी करवाई केल्याने सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची देखील पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भगवान गडावर पोहोचले मंत्री धनंजय मुंडे; पंकजा मुंडेंना टोला
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जातील. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलावलं होतं. आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गॅस पेटवणं सोपं, पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे: मुख्यमंत्री
सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा म्हणजे औरंगाबादच्या बिडकिन भागामध्ये ५०० एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय या ५०० एकरपैकी १०० एकर हे फक्त महिला उद्योजिकांसाठी राखीव ठेवण्याचा देखील शब्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘२०२०च्या जून महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं. त्यानंतर मध्ये कुठेही ते काम अडू नये, याची काळजी आपल्याला करायची आहे. नाहीतर फक्त भूमिपूजनाच्या पाट्या आपल्याला जागोजागी दिसतात’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
बीड जिल्हा परिषद: पंकजा मुंडेंनी पराभव आधीच मान्य केला?
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली. लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःला कॅबिनेट मंत्रिपद व मुलाला आमदारकी जाहीर न झाल्याने अब्दुल सत्तारांचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची साथ सोडणारे आ. राणाजगजितसिंह पाटील राजकीय अडचणीत
आज राष्ट्र्वादीत असते तर मंत्रीपदी वर्णी निश्चित असली असती, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी लाटेच्या आशेवर भारतीय जनता पक्षात उडी घेऊन पवार कुटुंबियांशी दगा करणारे आमदार राणा राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील सध्या राजकीय पेचात पडण्याची शक्यता आहे. मूळ मतदारसंघ सोडून दुसऱ्याच मतदारसंघातून ते निवडून आले खरे, मात्र त्यांचं उस्मानाबाद’मधील राजकीय भविष्य धिक्यात येऊ शकतं.
5 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडेंचा देखील मंत्रिमंडळात समावेश निश्चित
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून पाडलेली छाप आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 30 हजारांहून अधिक मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षाकडून कॅबिनेट मंत्रिपद निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबईत आज होणाऱ्या शपथविधीसाठी परळीसह जिल्ह्यातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास असेल. सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार असून धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून रीतसर निरोप आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
'आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे'... आ. धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
गोपीनाथ मुंडेंची गुरुवारी जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच जोरदार शक्तिप्रदर्शन करून पंकजा मुंडे पुढील डावपेचांची आखणी करणार हे नक्की.
5 वर्षांपूर्वी