महत्वाच्या बातम्या
-
मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आणि उद्योगपती मजेत - राहुल गांधी
उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
बीडच्या समस्या राहिल्या दूर; घरोघरी जाऊन कलम ३७०बद्दल सांगण्याची शहांची अजब सूचना
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
6 वर्षांपूर्वी -
शहांकडून 'बोला भारत माता की जय' आडून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या विषयांना बगल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र विधानसभा: अमित शहांचा अजब प्रचार; सभा बीड'मध्ये आणि तुणतुणं काश्मीरचं
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
6 वर्षांपूर्वी -
सीमेवर पुलवामासारखं काही घडलं नाही तर राज्यात सत्तांतर निश्चित होईल: शरद पवार
पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा पाकिस्तान द्वेष मतांसाठी; नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? - धनंजय मुंडे
नाशिमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हरकत घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आधीच दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बीडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची शरद पवारांकडून घोषणा
आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्यानं काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच त्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ मोहरे मैदानात उतरवले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मित्रपक्ष: भाजपने मेटेंचं राजकीय अस्तित्व संपवलं; चौथा समर्थक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा भाजपात
बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याला माहित आहे. जिल्हा परिषदेतील कारभाराच्या तक्रारींवरुन मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आणि पुन्हा मेटे-मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. आता हाच राजकीय दुरावा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरवणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद: पवार कुटुंबीय देखील शिवसेनेच्या वाटेवर?
एनसीपीला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. एनसीपीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: राजकीय फायद्यासाठी एमआयएम'शी साटंलोटं करत निवडणूक जिंकून दाखवली
लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ आणि शिवसेनेत झालेल्या लढतीत ‘एमआयएम’ने शिवसेनेचा पराभव केला होता. पण त्याच ‘एमआयएम’ने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी असतील याची चर्चा सुरू झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही: आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्याच्या जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. रविवारी सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा परभणीहुन बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी बीडमध्ये नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना शेतकऱ्यांविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही अस विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आ. राणाजगजीत सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ती अफवा; नेमका विषय आला समोर: सविस्तर
देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपपेक्षा वंचितला पसंती; भाजपाची देखील डोकेदुखी वाढणार
भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: ‘जय श्री राम’वरून निष्पाप झोमॅटो डिलिव्हरी बॉयना बेदम मारहाण
सध्या देशात हिंदू मुलसमान दंगली घडतील अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे का असा संशय व्यक्त केला जातो आहे. देशभरात आणि विशेष करून हिंदी भाषिक राज्यांच्या पट्ट्यात या विषयाला अनुसरून परिस्थिती नाजूक झालेली असताना आता याचे लोन महाराष्ट्रात देखील हळूहळू पसरू लागले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या घटनांनी पुन्हा जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
खिदी-खिदी हसून पाठिंबा देतात की बेंच वाजवून? भारती पवार यांना पाठींबा देण्यासाठी थांबलेलो: रक्षा खडसे
भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेमधील हसण्याचा एक व्हिडिओ समजा माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावरून रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यांच्या एकूणच स्पष्टीकरणावरून त्यांची किंवा करावी असंच म्हणावं लागेल. देशाने आजपर्यंत संसदेत एवढ्या विषयाला किंवा मुद्दयाला पाठिंबा देताना समर्थन करणारे खासदार हे हाताने बेंच वाजवून समर्थन देतात हे पाहिलं आहे. मात्र संसदेतील बेंचखाली तोंड लपवून खिदी-खिदी हसून समर्थन देण्याचा जावईशोध खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रतिक्रयेतून लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केलं
बीड : चोरटे नेमकं काय चोरी करतील याचा नेम नाही. यापूर्वी अनेकांनी एटीएम फोडून पैसे लुटण्याचे प्रकार केले आहेत. मात्र आता चोरट्यांनी कळसच गाठल्याचे दिसत आहे. हा प्रकार घडला आहे चक्क सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय असलेल्या ठिकाणी.
6 वर्षांपूर्वी -
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून गेलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली. मागील वर्षीच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा विरोध झाल्याने मुख्यमंत्र्यांना मुंबईतील वर्ष या निवासस्थानीच विठ्ठलाची पूजा करण्याची वेळ आली होती.
6 वर्षांपूर्वी -
खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू: उद्धव ठाकरे
राज्यात शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये सामील असून देखील शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर विरोधकांकडून केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर सामील आहोत, परंतु आम्ही सामन्य माणसाचा आवाज म्हणून सत्तेत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. जर आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये नेमका फरक काय राहिला? असा देखील प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
आज उद्धव ठाकरे यांचा नाशिक व औरंगाबाद दौरा; शेतकऱ्यांशी संवाद साधणार
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पीक विमा केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यात अजूनपर्यंत मान्सूनचं आगमन न झाल्याने परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट उभं राहिलं आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा दौरा असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी