महत्वाच्या बातम्या
-
मालेगावात सत्तेसाठी धर्म विसरून MIM सोबत सेटलमेंट, तर औरंगाबादमध्ये घरात घुसून मारण्याची सेनेकडून धमकी
महानगरपालिकेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेदरम्यान गोंधळ घातला होता. तर काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते. याच प्रकरणावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून २ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील हाय कोर्टाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याला देखील स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना गजाआड टाकण्याची सत्ताधारी पक्षांची खेळी फासल्याची चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खैरेंचा पराभव हा माझा पराभव; पण शिरूर व रायगडचा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख नाही
शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा मानहानीकारक पराभव झाला. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना दौऱ्यावर आलेले असताना दिली. मात्र शिरूर लोकसभा आणि रायगड लोकसभा मतदार संघातील अनुक्रमे शिवाजी आढळराव-पाटील आणि अनंत गीते यांच्या बद्दल कोणतेही भाष्य केले नाही. कारण हे दोन नेते देखील पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्ष संपली, विधानसभा आल्या; आता मुख्यमंत्र्यांकडून मराठवाडा दुष्काळमुक्तीची भाषा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा दौरे सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून आणि ३-४ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने त्यांच्याकडून पुन्हा मतदाराला आणि विशेष करून दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या मराठवाड्याला पुन्हा मृगजळ दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते म्हणाले ‘सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे, परंतु आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
अब्दुल सत्तार भाजपात आल्यास औरंगाबाद भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता
काँग्रेसचे सिल्लोडमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यावरून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत हस्तक्षेप होण्याची शक्यता असून स्थानिक नेते मंडळी नक्की काय निर्णय होतो त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेत 'त्या' १५३ जागांवर मनसेला मोठी सुवर्णसंधी: प्रकाश आंबेडकर
आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात पाणीबाणी! धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के पाणीसाठाच शिल्लक
महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
6 वर्षांपूर्वी -
नांदेड: काँग्रेसचे अशोक चव्हाण पराभूत; भाजपचे चिखलीकर विजयी
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे प्रतापराव चिखलीकर आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाचं मूळ कारण ठरलं आहे ते वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली मतं असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: एमआयएम'चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर सेनेचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर
लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एमआयएम’चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे थेट तिसऱ्या स्थानावर आहेत. तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सध्या प्राथमिक फेरीत चित्र.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.
6 वर्षांपूर्वी -
लातूरमध्ये दुष्काळामुळे गावकऱ्यांवर शरिराला हानिकारक पाणी पिण्याची वेळ
मराठवाड्यात दुष्काळाने अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्यात लातूरमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचं वृत्त आहे. पिण्याच्या पाण्याचा अनेक गावांमध्ये तुटवडा जाणवत असल्याने अनेक गावातील महिलांची वणवण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी शरीराला अपायकारक असलं तरी ते अशुद्ध पाणी पिण्याची वेळ अनेकांवर आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आधार मनसे टॅंकरचा, उद्धव ठाकरे परदेशात तर मुख्यमंत्र्यांचं मोबाईलवर दुष्काळ निवारण
सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऐतिहासिक दुष्काळ पडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील दुष्काळ दौऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर राज ठाकरे यांची मनसे अनेक गावांमध्ये पाण्याच्या समस्येतून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांना शक्य ती मदत करत आहेत. वाढलेली उष्णता आणि दुष्काळाला तोंड देत आसलेल्या उस्मानाबादची तहान मनसेचा टॅंकर भागवताना दिसतोय.शहरातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लोकांना या टॅंकरचा चांगलाच आधार होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर; दुष्काळाने होरपळलेल्या जनतेशी संवाद साधणार
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणी देखील करणार असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा: अशोक चव्हाण
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम टेम्परिंग होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाने या क्षेत्रात मोबाईल जॅमर बसवावे, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
जालन्यातील टाकळी अंबड येथे दीड तासापासून मतदान यंत्र बंद, मतदार निघून गेले
महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण १४ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दुपारी उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. यामुळे अनेकजण मतदान न करताच घरी निघून गेले गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबलं तरी मत भाजपला - प्रकाश आंबेडकरांचा आरोप
सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ई.व्ही.एम. मध्ये बिघाड, सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान
आज महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. परंतु बऱ्याच ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाडीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि पर्यायी लोकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागले. बरेच लोक रांगा पाहून पुन्हा मतदान न करता घराकडे वळाले आणि याचा एकंदरीत परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला.
6 वर्षांपूर्वी -
हे काय? चक्क कट्टर हिंदुत्ववादी व एमआयएम एकाच खोलीत, स्क्रिप्ट देताना?
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण प्रचारात व्हिडिओ पुराव्यानिशी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल होत असल्याने भाजपचे नेते देखील राज ठाकरे यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष करत आहेत. त्यात राज ठाकरे हे बारामतीच्या काकांच्या सांगण्यावरून सर्वकाही करत आहेत आणि त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते असा खोचक टोला देखील लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
इम्रान खान आणि मोदींचे फिक्सिंग : प्रकाश आंबेडकर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपसात फिक्सिंग आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आयसिसचा काही संबंध आहे का? ते मोहन भागवतांनी सांगावं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएस’वर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, या भेटीमागे दुसरे कोणतेही अर्थ काढू नका भेट कारण सहजच घेतली भेट होती आणि त्यामागे कोणतंही राजकारण नव्हतं असंही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
लातूरच्या शेतकरी कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या कंपनीने ३ लाख परत केले
सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघाला असताना, शेतीत होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यात अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त दुसऱ्या नोकरीच्या शोधात देखील भटकत आहेत. त्यात कमी शिक्षणाअभावी आणि पूर्व अनुभव नसल्यामुळे शहरांमध्ये नोकरी मिळणे देखील अतिशय कठीण असल्याचे अनुभव त्यांना येत आहेत.
6 वर्षांपूर्वी