महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणाऱ्या प्रतिनिधींचा लातूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध
आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजाचे काही समन्वयक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली. परंतु त्या विरुद्ध आज लातूर मध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबईमधील बैठकीचा तीव्र निषेध करण्यात आला आणि मुंबईतील ती चर्चा आम्हाला मान्य नाही अस सांगण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी -
पंकजांना एका तासासाठी मुख्यमंत्री करावं: शिवसेना
जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता शिवसेनेसुद्धा संधी न घालवता सामना वृत्तपत्रातून पंकजा मुंडे आणि अप्रत्यक्ष रित्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नेते मंडळी काय बोलत आहेत? मराठा आरक्षण ग्रामविकास किंवा महिला व बालविकास मंत्रालय कस देऊ शकत? तिथे का फाईल जाईल?
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं की, ‘माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते’. परंतु मराठा आरक्षणाची फाईल ग्रामविकास मंत्रालय किंवा महिला व बालविकास मंत्रालयात का जाईल आणि ग्रामविकास विकास मंत्र्यांनी फाईल वर सही केली असती तर मराठा समाजाला आरक्षण लागू झालं असतं? अशी विधानं का केली जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
स्टंन्ट? सेना आ. हर्षवर्धन जाधवांचा जुलै २०१८ ई-मेलद्वारे राजीनामा, डिसेंबर २०१५ पत्राद्वारे, ऑक्टोबर २०१५ फॅक्सद्वारे प्रयोग झाले आहेत
मराठा आरक्षण तापू लागल्याने अनेक राजकारणी नवं नवे प्रयोग करताना दिसतील आणि त्यातले काही जण असे प्रयोग अनेक वेळा करून झाले आहेत आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव त्यातीलच एक असच म्हणावं लागेल. भावनिक राजकारण आणि संधीचा फायदा असच त्या मागील कारण असावं असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
हिंसा नको, सरकार चर्चेला तयार: मुख्यमंत्री फडणवीस
मराठा समाजाने हिंसा वा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबादेत आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून औरंगाबादेत पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे या युवकाने नदीत उडी घेऊन निषेध नोंदवताना आपला जीव गमावला होता. काल म्हणजे मंगळवारी जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे वय वर्ष ५५ यांनी आंदोलनादरम्यान विषप्राशन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या
औरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्च्या आंदोलनात काही पेड लोकं घुसली आहेत: चंद्रकांत पाटील
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा आहे. परंतु काही पेड लोक या आंदोलनांत घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे.
7 वर्षांपूर्वी -
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मराठा क्रांती मोर्चेकरी सेना खासदार खैरेंच्या अंगावर धावले आणि हाकलून दिल
काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
परभणीत मराठा आंदोलन चिघळलं, ६ बसेस आणि पोलीस व्हॅन सुद्धा जाळल्या
मागील २ वर्षापूर्वी शांततेत पार पडलेले मराठा समाजाचे मोर्चे आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये ४ खासगी गाड्या, ५ बसेस आणि पोलिसांची व्हॅन जाळली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्णय घोषित करते वेळी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या या निर्णयाची आता खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय? पुढे काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य तसेच देशपातळीवरील अनेक विषयांना हात घालत त्यावर दिलखुलास उत्तर दिली.
7 वर्षांपूर्वी -
राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं सुरु आहेत, ती आंदोलनं लोकांसाठी आहेत: राज ठाकरे
काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारची जनहिताची आंदोलन करून महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. त्यापैकी एक महत्वाचं आंदोलन म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या जनहिताच्या आंदोलनाचा आणि कार्यकत्यांचा मला अभिमान असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून ही भावना व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना व उद्योगपतींना मोठ्या मनाने मिठ्या मारल्या: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिल्याच्या विषयाला अनुसरून ट्विटर द्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. कारण त्या आलिंगनानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सर्वच थरातून नोंदवल्या जात आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आलिंगन दिल खरं, परंतु मोदींनी उभं राहण्याची तसदी घेतलेली पाहायला मिळाली नाही.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमधील कचराकोंडीने नाशिकमधील मनसेच्या काळातील कचरा व्यवस्थापनाच महत्व अधोरेखित झालं?
परंतु औरंगाबाद महापालिकेतील कचराकोंडीने आणि वाईट अनुभवातून, नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात झालेलं कचरा व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाचं शहराच्या दृष्टिकोनातून महत्व अधोरेखित होत आहे. एकूणच औरंगाबादमधील तब्बल ५ महिण्यापासून झालेल्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला आणि भाजपला अक्षरशः अपयश आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ टेंडरशाहीत गुंतलेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने औरंगाबाद बकाल केलं असून रोजच जगन सुद्धा तोंडावर रुमाल ठेऊन करावं लागत आहे आणि आता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेला स्वतःची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची वेळ का आली आहे?
औरंगाबाद महापालिकेत ५ महिन्यापासून कचराकोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने साठलेला कचरा कुजल्याने रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु अनेक महिन्यापासून हा प्रश्न जटील होत चालल्याने नागरिकांमध्ये सुद्धा रोष वाढत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या संघर्षात जनतेची होरपळ होत असल्याने मुंख्यमंत्र्यांवरील दबाव वाढत आहे.
7 वर्षांपूर्वी -
वादळ पुन्हा येणार? लवकरच मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या दिशेने?
मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा येणार पुन्हा येणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन केले आणि हेच वादळ लवकरच मुंबईच्या दिशेने येतंय काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मराठवाडा दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींवर अधिक भर देणार असल्याचे समजते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील पक्ष बांधणी अधिक मजबूत करून स्थानिक कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
7 वर्षांपूर्वी