महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीचा भाजपाला जोरदार धक्का | भाजपचे ज्येष्ठ नेते व वैद्यनाथ कारखान्याच्या व्हाईस चेअरमनसह 5 संचालक राष्ट्रवादीत
लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांनी ईडीचा सामना केला | भाजपचं काम ED करतंय - जयंत पाटील
लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
River Confluence Project | गुजरातकडून अधिक लाभाच्या अटी टाकल्याने नदीजोड प्रकल्पात अडचणी - जलसंपदामंत्री जयंत पाटील
नदीजोड प्रकल्पांबाबत आम्ही चर्चा करत आहोत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एमओयू होणे गरजेचे आहे. मात्र गुजरात सरकार त्यांचा लाभ आधिक होईल अशाच अटी-शर्ती टाकत आहे. त्यामुळे एमओयू होत नाही. म्हणूनच या प्रकल्पाचे काम सध्या फारसे होत नसल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत दिली.
4 वर्षांपूर्वी -
महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय | पण त्यावर बातम्या बनत नाहीत - जयंत पाटील
देशातील महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय. आज महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमध्ये शर्यत लागली आहे. पण बातम्यांवर काहीच दाखवले जात नाही. तिकडे अमेरिका, अफगाणिस्तानबाबत सांगितलं जातं. परंतु, इकडे सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हे कोणी दाखवत नाही. फॉल्स प्रपोगंडा राबवला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी जिंतूरच्या संवाद यात्रेत केला.
4 वर्षांपूर्वी -
ED कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? | CBI-ED'च्या कामाला काही दर्जा आहे की नाही? - सुप्रिया सुळे
मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भ्रष्ट राष्ट्रवादीच्या विळख्यातून आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ - खा. प्रीतम मुंडे
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे. तसेच अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ, असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाने शिवसेनेला युतीत भरपूर त्रास दिला | त्यामुळे पुढची २५ वर्षे शिवसेना युती करणार नाही - आ. अमोल मिटकरी
सत्ता न मिळाल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणेंपासून चंद्रकांतदादांपर्यंत सत्ताबदलाची भविष्यवाणी व्यक्त करत आहेत. मूळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेले भावी सहकार्यांचे वक्तव्य हे भाजपासाठी नसून इतर एखाद्या जुन्या सहकार्याबद्दल होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी मंत्री म्हणू नका? | चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा खरोखर वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
माजी बोलायचं होतं पण चुकून भावी बोलून गेले? | मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Marathwada Mukti Sangram | मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी 24 मोठ्या घोषणा - सविस्तर माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादेत आहेत. त्यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन त्यांनी केले. यावेळी भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठ स्थापन करण्याची घोषणा केली. यासोबतच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 24 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
CM Uddhav Thackeray Aurangabad Tour | मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला मनसेही विरोध करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय.
4 वर्षांपूर्वी -
दरेकरांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार | सक्षणा सलगर यांचा इशारा
भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
आधी प्रकरण कौटुंबिक असल्याचं म्हटलं | आता बीड भाजप करुणा शर्मांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार
जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचे मत बीड भाजपने व्यक्त केले आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीडमध्ये भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | आंबाजोगाई कोर्टाने शिक्षा सुनावली
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय | सखोल चौकशी सुरु
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा मुंडे परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू असल्याचे समजते आहे.
4 वर्षांपूर्वी -
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करा | आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. यावर्षी गणेश मंडळांनी संख्या न वाढवता जुन्याच गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद | ऑटो चालक काढत होता छेड, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी | आरोपीला अटक
औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.
4 वर्षांपूर्वी -
कोट्यवधीचा मोबाईल घोटाळा | अंगणवाडी सेविकांना निकृष्ट दर्जाचे मोबाईल | पंकजांची चौकशी करा - अंगणवाडी सेविका
राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना भाजपा सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी सोमवारी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी मोबाईल परत करत आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकार्यांना देऊन टाकले. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण द्यायचं कुठून? इंदिरा सहानी केसने हात बांधले | 50 टक्क्यांची कॅप बदला - संभाजीराजे
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | आरक्षण मिळवण्यासाठी आधी मागासलेपण सिद्ध करावे लागेल - संभाजीराजे छत्रपती
इच्छा नसताना मराठा समाजाला पुन्हा आंदोलनाला सुरुवात करावी लागत आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 127 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती राज्याचा दौरा करत आहेत. ते पैठणगेट येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
4 वर्षांपूर्वी