महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा | भाजप ते करत नसेल तर... - हर्षवर्धन जाधव यांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच कायदा करू शकतं | भाजप खासदारांनी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांना ठोकणार - हर्षवर्धन जाधव
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षाने टीकेची तोफ डागली. तसेच, मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला. मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावरुनच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मेटेंच्या बैठका | १६ तारखेनंतर राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी, कोरोना संकट भीषण होण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाने काल मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निश्चय केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | लसीकरणासाठी गर्दी-धक्काबुक्की, सोशल डिस्टन्सिगचे पालन न केल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
कालच्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र देशात कोरोना वेगाने पसरतोय आणि देशाची चिंता वाढताना दिसतेय.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण, 258 मृत्यू | विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
4 वर्षांपूर्वी -
८ रुग्णांना एकाच चितेवर अग्नी | परिस्थिती बिकट | विरोधकांकडून लॉकडाऊन शिथिल करण्यावरून राजकारण
सध्या राज्यात ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याला कारण ठरलं आहे ते लोकं न समजून घेणारे गांभीर्य असं सांगितलं गेलं. मृतांचा आकडा वाढत असताना विरोध मात्र याचं भावनिक राजकारण करून राज्य सरकारला लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी दबाव वाढवत आहेत. एका बाजूला राज्य सरकारच्या निर्णयाला समर्थन देऊ असं म्हणणारे भाजप आणि मनसेचे पदाधिकारी आता निर्णय झाल्यानंतर पलटल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला होता. पण ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. उपाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मतदान घ्यावे लागले. यात अर्जून गाडे यांचा ६ मतांनी दणदणीत विजय झाला.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपच्या पॅनलचा धुव्वा
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकत महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर महाविकासआघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे पालकमंत्री अशेक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १३, राष्ट्रवादी काँग्रेसने ३ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये लोटसचं ऑपरेशन | भाजपचे माजी आमदार नितीन पाटील शिवसेनेत
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कामचुकारपणामुळे महिलेला कामावरून काढण्यात आलेलं | संबधित महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल आहे
परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबदमध्ये लाॅकडाऊनचा निर्णय मागे | मात्र रात्रीची संचारबंदी कायम
सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (३१ मार्च) औरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून बुधवारी काढण्यात येणारा माेर्चाही रद्द करण्यात आल्याची घाेषणा पत्रकारांशी बाेलताना केली.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड हल्ला प्रकरण | 400 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल | कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक
होळीच्या मिरवणुकीवरुन नांदेडमध्ये जमावाने थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने हल्ला केला. मात्र एसपी प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी असून रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या गाणार होत्या | म्हणून पोलिसांच्या कल्याणार्थ कार्यक्रमात पोलिसांनाच तिकीट विक्रीच काम दिलेलं
२०१७ मध्ये औरंगाबाद पोलिसांनी सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. वादाचं कारण होतं पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्त्यव्य सोडून या कार्यक्रमाचे तिकिट विकायला भाग पाडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या तिकिटांची किंमत किंमत ५१ हजार रुपये इतकी होती. सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
बीड डीसीसी बॅंक निवडणुक | धनंजय मुंडेंसमोर पंकजा मुंडेंनी आधीच पराभव मान्य केला?
बीड जिल्ह्यातील राजकारण वेगाने बदलत आहे. बीड जिल्ह्यावर मंत्री धनंजय मुंडे यांचा प्रभाव वाढत असताना पंकजा मुंडे मात्र वारंवार आधीच पराभव मान्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. सहकार क्षेत्रातील स्थान कमजोर झाल्यास पंकजा मुंडे यांचा भविष्यातील मार्ग देखील कठीण होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद लॉकडाउन | परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहन मिळेना | मदतीला पोलिस दादा धावला
औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ११ मार्चपासून औरंगाबाद शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आज कॅनॉट, अविष्कार चौक, बळीराम पाटील शाळा, टिव्ही सेंटर अशा विविध भागात बंद पाळण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या वडिलांकडून शांताबाई राठोड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत, त्यामुळे शांताबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी तक्रार लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे, त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठवाडा-विदर्भात अजित पवारांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला होता.
4 वर्षांपूर्वी -
योगायोग? पूजाने ३ वर्ष भाजपसाठी काम | तर मृत्यूदिवशी इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवक
राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी