5G Recharge Plan | 5G साठी दरमहा किती पैसे मोजावे लागतील? एअरटेल, जिओसह या कंपन्यांचा रिचार्ज प्लान पाहा

5G Recharge Plan | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशात ५ जी सेवा सुरू केली. त्यानंतर देशात दूरसंचार क्षेत्रासाठी काम करणाऱ्या देशी आणि विदेशी सेवा पुरवठादार कंपन्यांच्या वतीने 5 जी सेवा सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राजधानी दिल्ली, मुंबई, वाराणसी, बंगळुरू, गुरुग्राम, चेन्नईसह 8 शहरांमध्ये एअरटेलने अंशतः 5 जी सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर जिओ यंदा दिवाळीच्या आसपास 5 जी सेवा सुरु करण्याबाबतही बोलत आहे. अशा परिस्थितीत दूरसंचार कंपन्यांकडून 5 जी सेवेसाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स दिले जाणार आहेत? त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी एक नजर टाकूया.
5G सेवेसाठी दर महिन्याला इतका खर्च येणार :
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, पूर्वी 1 जीबी इंटरनेट डेटाची किंमत 300 रुपयांच्या आसपास होती, मात्र आता ती 10 रुपयांच्या आसपास झाली आहे. सध्या देशातील इंटरनेट युजर दर महिन्याला सरासरी १४ जीबी डेटाचा वापर करतो. प्रति जीबी 300 रुपये दराने 14 जीबी डेटाची किंमत वाढून 4200 रुपये झाली आहे. पण केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे महिन्याला वापरल्या जाणाऱ्या डेटाची किंमत सरासरी १२५ ते १५० रुपयांपर्यंत आहे. देशातील दूरसंचार क्षेत्रासाठी काम करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या तुलनेत जिओचा हा प्लान सर्वात स्वस्त असेल, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सध्या 4जी सेवेसाठी चालवण्यात येत असलेले रिचार्ज प्लॅन्सही 5 जी सेवेसाठी असतील, अशी माहिती एअरटेलने दिली आहे.
5G सेवा योजना किती अपेक्षित आहे :
इंटरनेट डेटा असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळवण्यासाठी देशातील लोक महिन्याला सरासरी 400 ते 600 रुपये खर्च करतात. अशा परिस्थितीत 5 जी सेवेसाठी रिसर्ज प्लॅनची किंमत या रेंजमध्ये असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र यासाठी ग्राहकांना एअरटेल आणि जिओच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) कंपनीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या वतीने 5 जी सेवा सुरू करण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. बीएसएनएल पुढील वर्षी 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर 5 जी सेवा सुरू करणार आहे, त्यामुळे या दोन्ही दूरसंचार सेवा संस्थांच्या ग्राहकांना या सेवेसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: 5G Recharge Plan need to know check details 09 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं