Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स तेजीत पैसा वाढवतोय, 5 दिवसात 58 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स नोट करा

Adani Green Share Price | मागील काही दिवसांपासून अदानी ग्रुपचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. त्यापैकीच एक अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 1605.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
अदानी ग्रीन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,42,119.36 कोटी रुपये आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी अदानी ग्रीन स्टॉक 4.32 टक्के वाढीसह 1,631 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला कळवले की, आंतरराष्ट्रीय बँकांच्या कन्सोर्टियममधून अदानी ग्रीन कंपनीने 1.36 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे. मागील काही दिवसांत हिंडेनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सकारात्मक टिप्पणीमुळेही गुंतवणूकदारांनी अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल योग्य मानू नये, असे म्हटले होते. यासह सर्वोच्च न्यायालयाने सेबीला योग्य पुराव्यासह अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, मार्च 2021 मध्ये अदानी ग्रीन कंपनीने 1.36 अब्ज डॉलर्स वित्तपुरवठा झाल्यापासून आतपर्यंत कंपनीने एकूण 3 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे. या निधीचा वापर गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा उद्यानाच्या विकासासाठी खर्च केले जाणार आहे.
अदानी ग्रीन कंपनी गुजरात राज्यातील खवरा येथे जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा उद्यान उभारणार आहे. 2030 पर्यंत 45 GW कार्यान्वित नूतनीकरणक्षम क्षमता असलेले हे कार्यरत होईल. या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी ग्रीन एनर्जी कंपनी निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने भारताच्या प्रवासातही हातभार लावणार आहे.
अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,185.30 रुपये होती. या किमतीच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स 27 टक्के खाली ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439.35 रुपये होती. या किमतीच्या तुलनेत अदानी ग्रीन स्टॉक 265.45 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Green Share Price NSE 07 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं