Adani Group Stocks | अदानी ग्रुपचे हे 3 शेअर्स हिंडेनबर्ग दणक्यानंतर सावरत आहेत, मात्र स्टॉक खरेदी करावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Adani Group Stocks | हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुप स्टॉक्स अक्षरशः क्रॅश झाले होते. मागील 6 महिन्यांत ज्या गुंतवणूकदारांनी अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना जबर नुकसान सहन करावा लागत आहे. सध्या देखील या तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लोक 50 ते 81 टक्के तोट्यात आहेत.
मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3550.75 रुपयेवरून घसरून 672.25 रुपयेवर आले होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 2657 रुपयेवरून घसरून 831.30 रुपये किमतीवर आले आहेत. तर अदानी ग्रीन स्टॉक 2024.90 रुपयांवरून 41 टक्क्यांच्या घसरणीसह 983.80 रुपये किमतीवर आले होते.अदानी ग्रुपचे स्टॉक खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ञांचे मत आणि त्याचे मूल्यांकन जाणून घेणे गरजेचे आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स आर्थिक, मालकी, किंमत मूल्यांकन आणि कामगिरी विचारात घेता अदानी गॅस कंपनीला एकूण 12 नकारात्मक गुण मिळाले आहेत. तर तज्ञांनी या स्टॉकला 11 सकारात्मक गुण दिले आहेत. आर्थिक आघाडीवर तज्ञांनी अदानी टोटल गॅस स्टॉकला 6 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण दिले आहेत. तज्ञांनी या स्टॉकला 3 सकारात्मक आणि 1 नकारात्मक गुण दिला आहे. समवयस्क स्पर्धकांच्या तुलनेत तज्ञांनी या स्टॉकला 2 नकारात्मक आणि 1 सकारात्मक गुण दिले आहेत. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.33 वाढीसह 671.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ग्रीन कंपनीच्या स्टॉकवर तज्ञांनी 12 नकारात्मक आणि 11 सकारात्मक गुण दिले आहेत. तर आर्थिक आघाडीवर 3 सकारात्मक आणि 5 नकारात्मक गुण दिले आहेत. मालकीच्या दृष्टीने तज्ञांनी या स्टॉकवर 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण दिले आहेत. तर समवयस्क स्पर्धकांच्या तुलनेत तज्ञांनी या स्टॉकवर 1 नकारात्मक आणि 2 सकारात्मक गुण दिले आहेत. मूल्य आणि किंमत विचारात घेता तज्ञांनी या स्टॉकला 4 नकारात्मक आणि 4 सकारात्मक गुण दिले आहेत. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 965.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरला तज्ञांनी एकूण 26.09 टक्के गुण दिले आहेत. येथे तज्ञांनी या स्टॉकवर एकूण 17 नकारात्मक आणि 6 सकारात्मक गुण दिले आहे. तर आर्थिक आघाडीवर 2 सकारात्मक आणि 6 नकारात्मक गुण दिले आहेत.
तज्ञांनी या स्टॉकवर 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण देऊन स्टॉकबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. तर समवयस्क स्पर्धकांच्या तुलनेत तज्ञांनी या स्टॉकवर 2 नकारात्मक आणि 1 सकारात्मक गुण दिला आहे. मूल्य आणि किंमत विचारत घेऊन तज्ञांनी या स्टॉकला 7 नकारात्मक आणि 1 सकारात्मक गुण दिले आहेत. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 1.15 वाढीसह 824.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Group Stocks today on 16 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं