Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, किती मिळेल परतावा?

Adani Port Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स लवकरच 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअरवर 1050 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्या अदानी ग्रुपच्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स 810 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 810.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे एकु. 65.53 टक्के भाग भांडवल धारण केले होते. FII ने या कंपनीचे 13.83 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर DII ने 13.22 टक्के वाटा धारण केला होता.
मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अदानी पोर्ट्स कंपनी बंदर माल वाहतूक क्षेत्रात मोठा वाटा काबीज करते. 2023-25 मध्ये कंपनीचे कार्गोचे व्यापारी प्रमाण 13 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीचा महसूल प्रमाण 20 टक्के, EBITDA प्रमाण 17 टक्के, आणि कंपनीचा PAT वार्षिक 12 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 1,761.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,737.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने एकूण 6,951.86 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5,648.91 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने 3,751.54 कोटी रुपये खर्च नोंदवला होता, जो या तिमाहीत वाढून 4,477 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Port Share Price NSE 14 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं