Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर तेजीच्या दिशेने, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदीला गर्दी

Adani Port Share Price | गौतम अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024- 25 च्या जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 47 टक्क्यांच्या वाढीसह 3,107 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचा निव्वळ नफा 2,119 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )
जून तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 8,054.18 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6,631.23 कोटी रुपये कमाई केली होती. जून तिमाहीत अदानी पोर्ट्स कंपनीचा खर्च वाढून 4,238.94 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत 4,065,24 कोटी रुपये होता. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 0.088 टक्के वाढीसह 1,591.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुरूवारी अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढून 1590 रुपये किमतीवर पोहचले होते. 3 जून 2024 या कंपनीचे शेअर्स 1.607.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या कंपनीचे शेअर्स 751.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
अदानी समूह व्हिएतनाम देशाच्या डनांग या किनारी शहराच्या लियान चीयू बंदरात 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. या कंपनीला व्हिएतनामच्या दक्षिण मध्य तटीय प्रांत बिन्ह थुआनमध्ये थर्मल पॉवर प्रकल्पात देखील 2.8 अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करायची आहे. यासह अदानी समूह लॉन्ग थान आणि चू लाइ विमानतळाच्या बांधकामासह विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात व्हिएतनामी भागीदारांना सहकार्य करण्याची योजना आखत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Port Share Price NSE Live 02 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं